Advertisement

... म्हणून ब्रिटनकडून ठाकरे सरकारचं कौतुक

ब्रिटन हाय कमिशननं ठाकरे सरकारचे आभार का बरं मानले? जाणून घ्या...

... म्हणून ब्रिटनकडून ठाकरे सरकारचं कौतुक
SHARES

कोरोनामुळे साऱ्या जगात हाहाकार माजला आहे. आतापर्यंत ९६ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १६ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अशा परिस्थितीत जगातील सर्व देशांमध्ये जवळजवळ लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीतही महाराष्ट्र सरकारनं भारतात अडकलेल्या २३० ब्रिटिश नागरिकांना मायदेशी पाठवण्याची तयारी केली आहे.

शुक्रवारी भारतात अडकलेल्या २३० नागरिकांसाठी मुंबईहून चार्टर प्लेन रात्री रवाना झालं. फक्त मुंबईतून नाहीतर आता गोव्यात अडकलेल्या पर्यटकांसाठीही १४ ते १५ एप्रिल दरम्यान सोय करण्यात आली आहे. ब्रिटिश नागरिक सुखरूप मायदेशी रवाना झाल्यानंतर तेथील सरकारनं ट्वीट करत ठाकरे सरकारचे आभार मानले.

ब्रिटनमधून पर्यटनासाठी आलेले बरेच नागिरक होते. त्यांच्या सुटकेसाठी ब्रिटिश सरकारनं भारताकडे मदत मागितली होती. कोरोनाचे संक्रमण वाढल्यानंतर सर्व परदेशी नागरिकांना क्वारंटाइन करण्यात आलं होतं. आता त्यांची वैद्यकीय चाचणीकरून त्यांना पुन्हा मायदेशी पाठवण्यात आलं आहे.

ब्रिटनमध्येही कोरोनाची भीती दिवसेंदिवस वाढत आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत ६५ हजार ०७७ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, ७ हजार ९७८ लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना काही दिवसांपूर्वी आयसीयूमध्ये ठेवले होते, मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.



हेही वाचा

मुंबई डबेवाला असोसिएशन डबेवाल्यांच्या मदतीला

Coronavirus Update: मुंबईत आता ड्रोनच्या माध्यमातून होणार निर्जंतुकीरण

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा