Advertisement

Coronavirus: सफाई कामगारांमध्ये भेद कशाला?, समान भत्ते देण्याची मनसेची मागणी

कंत्राटी कामगारांना खूपच कमी पगार आणि सोयी-सुविधा मिळतात. पण किमान करोनाविरोधातील आपल्या लढाईच्या काळात तरी या कंत्राटी कामगारांविषयी भेदभाव केला जाऊ नये, अशी मागणी मनसेने केली आहे.

Coronavirus: सफाई कामगारांमध्ये भेद कशाला?, समान भत्ते देण्याची मनसेची मागणी
SHARES

संचारबंदीमुळे (curfew) सध्या लोकल ट्रेन आणि बेस्ट बस बंद असल्यामुळे महापालिकेच्या कायम सेवेतील सफाई कर्मचाऱ्यांना कामावर येण्या-जाण्यासाठी महापालिकेकडून ३०० रुपयांचा विशेष भत्ता सुरु करण्यात आला आहे. तसंच या सफाई कर्मचाऱ्याना कामावर असताना एकवेळ जेवण उपलब्ध करून देण्यासाठीही महापालिका अधिकारी प्रयत्नशील आहेत. असं असताना कंत्राटी कामगारांना मात्र अशी कुठलीही सोय उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे महापालिकेने कायमस्वरूपी कामगार आणि कंत्राटी कामगारांमध्ये (bmc employees) भेद न करता त्यांनाही या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेकडून (MNS) करण्यात आली आहे.

खांद्याला खांदा लावून काम

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक यांनी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी (bmc commissionar praveen pardeshi) यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. नाईक म्हणतात की, कोरोना व्हायरस (coronavirus) विरोधातील लढाई आता निर्णायक टप्प्यात येऊन पोहोचली आहे. राज्य सरकारने संचारबंदी जाहीर केल्यामुळे ९५ टक्क्यांहून अधिक जनता घरात बसलेली असली तरी मुंबईसारखं महानगर स्वच्छ ठेवणारे कर्मचारी- कामगार घरी बसू शकत नाहीत.

हेही वाचा- मोदीजी ‘त्या’ ‘जन धन’ खात्यात ६ हजारांचं ‘धन’ टाका, मनसेची पंतप्रधानांकडे मागणी

महापालिकेच्या कायम सेवेतील सफाई कर्मचाऱ्याच्या खांद्याला खांदा लावून घनकचरा व्यवस्थापन विभागातील शेकडो कंत्राटी (bmc contract employees) कामगारही आपली मुंबई स्वच्छ करण्यासाठी दररोज कार्यरत असतात. कायम सेवेतील सफाई कर्मचाऱ्याच्या तुलनेत या कंत्राटी कामगारांना खूपच कमी पगार आणि सोयी-सुविधा मिळतात. पण किमान कोरोनाविरोधातील आपल्या लढाईच्या काळात तरी या कंत्राटी कामगारांविषयी भेदभाव केला जाऊ नये.

भत्ता, जेवणाची सुविधा द्या

मुंबईच्या गल्ल्यागल्ल्यांतून कचरा जमा करणारे स्वच्छक कामगार, रस्ते सफाई करणारे कामगार, कचरा गाड्या भरणारे कामगार आणि कचरा गाड्या चालवणारे वाहन चालक व स्वच्छक - या कंत्राटी कामगारांनाही त्यांचे कर्तव्य बजावण्यासाठी आपण  विशेष भत्ता आणि जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्वरित आदेश द्यावेत.

लढाईच्या काळात सैन्यात एकजूट असणं महत्वाचं असतं. सैन्यातच भेदभाव केला तर सैनिकांमध्ये एकजूट कायम कशी राहणार? शत्रूविरोधात प्रभावीपणे कसे लढणार? पालिका प्रशासनाचे प्रमुख म्हणून पालिकेच्या सेवेतील कायम कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी यांच्यात भेदभाव करणं हे आपल्याला निश्चितच भूषणावह नाही. हा भेदभाव त्वरित थांबवून कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही सन्मानजनक वागणूक मिळेल, अशी विनंती नाईक यांनी केली आहे.

हेही वाचा- चिंता नको, ६ महिने पुरेल इतका अन्नधान्यसाठा उपलब्ध- छगन भुजबळ

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा