Advertisement

कोरोना कॉलर ट्यूनसाठी अमिताभ यांचा आवाज ऐकू येणार नाही

अमिताभ बच्चन यांच्या आवाजाऐवजी एका महिलेचा आवाज वापरला जाणार आहे.

कोरोना कॉलर ट्यूनसाठी अमिताभ यांचा आवाज ऐकू येणार नाही
SHARES

कोणालाही फोन लावला की सर्वात आधी बिग बी अमिताभ बच्चन यांचा आवाज ऐकायला येतो. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या आवाजातली ‘कोरोना’ कॉलर ट्यून (Caller tune) ऐकून अनेकांना कंटाळा देखील आला असेल. पण आता अमिताभ बच्चन यांची कॉलर ट्यून ऐकू येणार नाही.

अमिताभ बच्चन यांच्या आवाजाऐवजी एका महिलेचा आवाज वापरला जाणार आहे. पण तो आवाज कोणाचा असेल यासंदर्भातील माहिती समोर आली नाही. आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता कोरोनापासून बचाव करण्याऐवजी लसीच्या मोहिमेबद्दल लोकांना जागरूक करणं आवश्यक आहे. त्यामुळे कॉलर ट्यूनही बदललेली असेल.

अमिताभ यांच्या आवाजाच्या वापराविरोधात याचिकादेखील दाखल करण्यात आली होती. ज्यामध्ये असं म्हटलं होतं की, त्यांना स्वतः कोरोना संसर्ग होऊन देला आहे. मग त्यांचा आवाज कसा काय वापरता येऊ शकतो.

गेल्या वर्षी जुलैमध्ये अमिताभ बच्चन, त्याचा मुलगा अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या राय बच्चन आणि नातू आराध्या यांना कोरोना झाला होता. दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते राकेशच्या वतीनं ही याचिका दाखल करण्यात आली होती.

त्यांनी कोर्टात सांगितलं की, अमिताभ बच्चन यांना कॉलर ट्यूनमधल्या आवाजासाठी केंद्र सरकारकडून पैसे दिले जात आहेत. तर देशात असे कोरोना वॉरियर्स आहेत जे हे काम विनामूल्य करण्यास तयार आहेत.

दरम्यान अमिताभ बच्चन यांनी बुधवारी कौन बनेगा करोडपती या मालिकेचे शूटिंग पूर्ण केलं. इतकंच नाही तर अमिताभ बच्चन यांनी एक ब्लॉग पोस्ट लिहून थकल्यासारखे आणि सेवानिवृत्त होण्याविषयी लिहिलं आहे. अशी चर्चा आहे की, हा केबीसीचा हा शेवटचा सिझन असेल.



हेही वाचा

पनवेल पालिका क्षेत्रात आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद

ठाणे, पालघर, रायगडसाठी कोरोना लशीचे १ लाख डोस

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा