Advertisement

कोरोनामुळे मुंबईत २४ तासात ४ मृत्यू, रुग्णांच्या संख्येतही वाढ

रविवारी कोविड -१९ मुळे शहरात शून्य मृत्यूची नोंद झाली होती. पण सोमवारी ४ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

कोरोनामुळे मुंबईत २४ तासात ४ मृत्यू, रुग्णांच्या संख्येतही वाढ
SHARES

रविवारी कोविड -१९ मुळे शहरात शून्य मृत्यूची नोंद झाली होती. पण गेल्या २४ तासात मुंबईत ४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) उघड केलेल्या आकडेवारीनुसार, शहरात सोमवारी, १८ ऑक्टोबर रोजी ३७३ नवीन कोरोनाव्हायरस प्रकरणं आढळली आहेत. तर ५४३ बरे झाले आहेत आणि ४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

यासह, शहरात रविवारी, १७ ऑक्टोबर रोजी ३६७ कोरोना रुग्ण सापडले होते. तर १८ ऑक्टोबरला ही आकडेवारी वाढलेली दिसून येत आहे. ३६७ वरून रुग्णांचा आकडा ३७३ च्या घरात गेला आहे. १० रुग्णांची वाढ अहवालात पाहायला मिळत आहे.

शिवाय, हे समोर आलं आहे की, व्हायरसमुळे मरण पावलेल्या चारही रुग्णांना इतर आजार देखील होते. मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर आजार ज्यामुळे त्यांच्या उपचारात अडथळे येत होते. एक रुग्ण ४० ते ५९ या वयोगटातील होता. तर इतर ३ ज्येष्ठ नागरिक होते.

दरम्यान, मुंबईत सध्या सक्रिय प्रकरणांची संख्या ४ हजार ८५३ आहे. मुंबईत रविवारी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली होती. २६ मार्च २०२० नंतर प्रथमच शून्य मृत्यूची नोंद झाली होती. पण अवघ्या २४ तासात ही परिस्थिती बदलली आहे.

याशिवाय, मुंबई महानगर प्रदेशात (MMR) देखील नवीन प्रकरणांमध्ये ६९१ पर्यंत घट नोंदवली गेली, ज्यात मुंबईत नोंदवलेल्या प्रकरणांचा समावेश आहे.

ठाणे महानगरपालिकेनं (TMC) मुंबईनंतर एमएमआरमध्ये सर्वाधिक ५१ प्रकरणं नोंदवली आहेत. पनवेलमध्ये ५०, नवी मुंबई ४४, रायगड २६ आणि वसई -विरार ३८, मुंबई, मीरा -भाईंदर आणि ठाणे वगळता एमएमआरमध्ये प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे.

राज्यानं मात्र रोजच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय घट नोंदवली आहे. १ हजार ७१५ वरून १ हजार ४८५ अशी घट रुग्णांच्या संख्येत पाहायला मिळत आहे.

अहवालांनुसार, राज्यात गेल्या २४ तासांमध्ये २७ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या २ लाख ३९ हजार ८१६ झाली आहे. राज्यातील प्रकरण मृत्यू दर २.१२ टक्के आहे.



हेही वाचा

मुंबईकरांची कोरोना डेल्टा व्हेरीयंटवर मात!

१००% लसीकरण झालेल्या इमारतींना पालिकेकडून प्रमाणपत्र

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा