मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमिवर प्रशासनाकडून प्रतिबंधक उपाय योजना केले जात असताना, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तोंडावर मास्क हे सक्तीचे असल्याचे आवाहन केले आहे. मात्र तरीही काही बेशिस्त बिनदिक्कत फिरत असल्याचे निदर्शनास आल्याने अशांवर पोलिस आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आता कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. या कारवाई दरम्यान गेल्या महिनाभरात मुंबईत विनामुखपटय़ा फिरणाऱ्या सुमारे ३ लाख जणांना पकडण्यात आले असून त्यांच्याकडून सात कोटींचा दंड वसूल करण्यात आला.
हेही वाचाः- संजय गांधी नॅशनल पार्क पर्यटकांसाठी पुन्हा खुले
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार प्रयत्न करत असताना, मागील काही दिवसात तसे यशही सरकारला आले आहे. कोरोना बाधित रुग्णांचा आकडा कमी होऊ लागल्याने नागरिकांमधील कोरोना संदर्भातची भिती कमी झाली असून पूर्वी प्रमाणे नागरिक शहरात वावरताना दिसत आहे. मात्र धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे मास्क वापरणे हे प्रशासनाने सक्तीचे ठेवले असताना, अनेक जण बिना मास्कचेचं फिरत आहेत. अशांवर आता पालिका आणि पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. एप्रिल महिन्यापासून १७ नोव्हेंबपर्यंत ३,४५,७९० लोकांना पकडण्यात आले होते. त्यांच्याकडून ७ कोटी २७ लाख रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. २९ नोव्हेंबरला कारवाई झालेल्यांची एकू ण संख्या ४ लाख ८५ हजारांवर गेली. तर १३ डिसेंबरला कारवाई झालेल्यांचा एकू ण आकडा ६ लाख ८३ हजार इतका वाढला. १७ नोव्हेंबरच्या कारवाईशी याची तुलना करता महिनाभरात तब्बल ३ लाख ३८ हजार जणांवर मुखपट्टी न लावल्याबद्दल कारवाई करण्यात आली. आतापर्यंत पालिके ने मुखपट्टी न लावणाऱ्यांकडून १४ कोटींचा दंड वसूल के ला आहे.
हेही वाचाः- अभिनेता अर्जुन रामपालला NCB ने पुन्हा बजावला समन्स
करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून नागरिकांनी मास्क वापरणे आवश्यक आहे. मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्यांकडून २०० रुपये दंड वसूल के ला जातो. मुंबईत विनामुखपट्टी वावरणाऱ्या नागरिकांवर अधिकाधिक कारवाई करण्याचे निर्देश पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले होते. मात्र तरीही अनेक नागरिक विनामुखपटय़ा फिरत असतात असे आढळून आले आहे.