Advertisement

हार्बर मार्गावर साडेचौदा तासांचा ब्लॉक

या कालावधीत वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यान लोकलसेवा ठप्प राहणार आहेत.

हार्बर मार्गावर साडेचौदा तासांचा ब्लॉक
SHARES

कुर्ला (kurla) आणि टिळक नगर (tilak nagar) स्थानकांदरम्यान नवीन डायव्हर्जन लाईनच्या कामासाठी शनिवारी 13 सप्टेंबरच्या रात्री ते रविवारी 14 सप्टेंबरच्या दुपारपर्यंत मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर वडाळा रोड-मानखुर्द दरम्यान साडेचौदा तासांचा ब्लॉक (block) घेण्यात आला आहे.

या कालावधीत वडाळा रोड (wadala) ते मानखुर्द (mankhurd) दरम्यान लोकलसेवा ठप्प राहणार आहेत. डाऊन हार्बर मार्गावरुन वाशी/बेलापूर/ पनवेलसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सीएसएमटीहून रात्री 10.14 वाजता सुटणार आहे.

कुर्ला आणि टिळक नगर स्थानकांदरम्यान नवीन डायव्हर्जन लाइनच्या (new diversion line) कामासाठी शनिवारी रात्री ते रविवारी दुपारपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. शनिवारी रात्री 11.05 ते रविवारी दुपारी 1 वाजून 35 मिनिटांपर्यंत ब्लॉक असेल.

वडाळा रोड आणि मानखुर्द स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर 14.30 तासांचा हा ब्लॉक असून यामुळे लोकल सेवेवर मोठा परिणाम होणार आहे.

ब्लॉक कालावधीत वडाळा रोड आणि मानखुर्द दरम्यान हार्बर मार्गावर उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत. सीएसएमटीहून शनिवारी रात्री 10.20 ते रविवारी दुपारी 2.19 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन हार्बर सेवा रद्द राहतील.

तसेच शनिवारी रात्री 10.07 वाजेपासून रविवारी दुपारी 12.56 वाजेपर्यंत पनवेलहून सीएसएमटीला जाणारी अप हार्बर सेवा रद्द राहणार आहे. ब्लॉकपूर्वीची शेवटची पनवेल-सीएसएमटी लोकल रात्री 9.52 वाजता सुटेल.

डाऊन हार्बर मार्गावरील वाशी/बेलापूर/पनवेलसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सीएसएमटीहून शनिवारी रात्री 10.14 वाजता सुटेल. ब्लॉकनंतरची पहिली लोकल अप हार्बर मार्गावरील पनवेल/बेलापूर/वाशी येथून रविवारी दुपारी 1.09 वाजता पनवेलहून सुटेल.

डाऊन हार्बर मार्गावरील पनवेल/बेलापूर/वाशीसाठी ब्लॉकनंतरची पहिली लोकल सीएसएमटीहून रविवारी दुपारी 1.30 वाजता सुटेल. ब्लॉकदरम्यान पनवेल-मानखुर्द-पनवेल दरम्यान विशेष लोकल चालवल्या जातील.



हेही वाचा

मुंबईत बॉम्बच्या धमकीमुळे पोलिस हाय अलर्टवर

एल्फिन्स्टन ब्रिज: बाधित इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन होणार

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा