Advertisement

नवी मुंबई पालिका कार्यालयाच्या मागील तलावात सापडली मगर

स्थानिक मच्छीमारानं काढलेल्या या मगरीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

नवी मुंबई पालिका कार्यालयाच्या मागील तलावात सापडली मगर
SHARES

बेलापूर इथं नवी मुंबई महानगरपालिके (NMMC)च्या मुख्य कार्यालयातील इमारतीच्या मागील दलदलीच्या तलावात एक मगर दिसली आहे. गेल्या दोन दिवसापासून ही मगर या तलावात पाहिली गेली आहे. स्थानिक मच्छीमारानं काढलेल्या या मगरीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

दलदलीच्या ठिकाणी जाणाऱ्या प्रत्येकास धोका निर्माण झाल्यानं स्थानिक मच्छीमारांनी वन अधिकाऱ्यांनाही मगरीला तिकडून दुसरीकडे स्थलांतरीत करण्यास सांगितलं आहे.

बेलापूर गावात राहणारे स्थानिक मच्छीमार नागेश पाटील यांनी सांगितलं की, “इथून मगर काढता यावा यासाठी व्हिज्युअल पुरावा वन अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे.”

राज्य वनविभागाचे मानद वन्यजीव वॉर्डन, रेकिंक असोसिएशन फॉर वन्यजीव कल्याण (रॉ)चे पवन शर्मा म्हणाले, "तिथं पुरेसे मासे आणि खेकडे असल्यानं त्या दलदलीच्या भागात मगरी जिवंत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या भागात मगरींचं वास्तव्य आहे. हे देखील शक्य आहे की कुणीतरी तिकडे सोडली असावी."



हेही वाचा

भिवंडीतील जिलानी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ३ लाखांची मदत

महाबळेश्वरच्या पर्यटन विकासासाठी 'इतका' निधी मंजूर

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा