Advertisement

डोंबिवलीतील फडके रोडवर जमावबंदी

दिवाळीच्या पहिल्या दिवशी फडके रस्त्यावर तरुण एकत्र येऊन जल्लोष करतात. मागील अनेक वर्षाची ही परंपरा आहे.

डोंबिवलीतील फडके रोडवर जमावबंदी
SHARES

दिवाळीच्या पाच दिवसांच्या काळात डोंबिवली पूर्वेतील फडके रस्त्यावर मोठा जल्लोष होत असतो. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फडके रस्त्यावर जल्लोष करणं म्हणजे कोरोनाला निमंत्रण देण्यासारखं आहे. हे लक्षात घेऊन पोलिसांनी या रस्त्याच्या परिसरात जमावबंदी आदेश लागू केला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचे फलक रामनगर पोलिसांनी लावले आहेत. फडके रस्ता, श्री गणेश मंदिरात परिसरात नागरिकांनी गर्दी करू नये, असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे.


दिवाळीच्या पहिल्या दिवशी फडके रस्त्यावर तरुण एकत्र येऊन जल्लोष करतात.  मागील अनेक वर्षाची ही परंपरा आहे. यंदा कोरोनामुळे या भागातील गर्दीला आवर घालण्यासाठी रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, फ प्रभागाचे प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत, अधीक्षक संजय साबळे यांनी फडके परिसराची पाहणी  केली होती.


फडके रस्त्यावर दिवाळी पहाट साजरी करण्यासाठी स्थानिक तरुणांसह ठाणे, बदलापूर, टिटवाळा भागातून तरुणाई येते. यावेळी लोकल प्रवासाला सामान्यांना मुभा नसल्याने हे तरुण दुचाकी, चारचाकी घेऊन फडके रोड परिसरात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी या भागात होऊ शकते. हा प्रकार टाळण्यासाठी फडके रस्त्याकडे येणारे पोहोच रस्ते बांबूचे अडथळे लावून बंद करणार आहे. फडके रोड, नेहरू रोड, टिळकरोड, रेल्वे समांतर रस्ता या सर्व रस्त्यांसह दिवाळीच्या काळात आजूबाजूच्या परिसरात देखील जमावबंदी जाहीर केली आहे.


हेही वाचा -

राज्यभरात फटाकेबंदीची विनंती मुंबई उच्च न्यायालयाकडून अमान्य

कोविशील्‍ड लसीची अंतिम चाचणी लवकरच, सीरमकडून घोषणा



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा