Advertisement

दादर-माटुंगा नाला पुन्हा गाळातच!


दादर-माटुंगा नाला पुन्हा गाळातच!
SHARES

माटुंगा परिसरातल्या रेल्वे वर्कशॉप शेजारील दादर-मांटुगा नाल्याची सफाई यंदाही हवीतशी झाली नसल्याने हा नाला पुन्हा गाळातच असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे नाल्याच्या काठावरच गाळाचा भार पडलेला दिसत आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे नाल्याची सफाई करण्यासाठी आणलेली मशिन बंद पडल्यामुळे ती कशीबशी बाहेर काढण्यात आली. मात्र त्यानंतर आणलेल्या दुसऱ्या मशिनने फक्त नाल्यातील पाणीच ढवळण्यात आले. त्यामुळे ही नालेसफाई फक्त दाखवण्यापुरतीच केली का? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. सुरुवातीला या नाल्याचा गाळ काढण्यात आला. मात्र हा गाळ नाल्याच्या काठावरच काढून ठेवण्यात आल्यामुळे या नाल्याची अवस्था पुन्हा जैसे थे झाली. त्यामुळे माटुंगा स्थानकासह आसपासचा भाग पावसाळ्यात पाण्याखाली जाण्याची भीती येथील रहिवासी व्यक्त करत आहेत.

या स्थानकाच्या पश्चिमेला सेनापती बापट मार्ग आणि पूर्वेला रेल्वे वसाहत, कमला रामननगर ही सुमारे 700 ते 800 कुटुंबं राहत असलेली वस्ती आहे. या कमला रामननगर वसाहतीला जोडूनच दादर माटुंगा नाला जातो. दरवर्षी या नाल्यातील गाळ नाल्याच्या आतील बाजूला कडेला ठेवला जातो. 


हेही वाचा

पूर्व उपनगरातील नालेसफाई 100 टक्के हा जोक - भाजपा

नालेसफाईच्या टक्केवारीवरून प्रशासन, सत्ताधाऱ्यांमध्ये दुमत


यंदा रेल्वे वसाहत आणि बेस्टच्या विद्युत उपकेंद्राच्या बाजूने नाल्यामध्ये सफाई करण्यासाठी मशिन उतरवण्यात आली. परंतु या मशिनने सफाई करुन गाळ बाजूला काढून ठेवल्यानंतर मशिनचा पट्टा तुटला. त्यानंतर काही दिवसांनी ही मशिन नाल्यातून बाहेर काढण्यात आली. त्यामुळे नाल्याच्या सफाईचे काम पूर्ण होऊ शकले नाही. 


ही मशिन बाहेर काढल्यानंतर दुसरी मशिन केवळ एक दिवसाकरता आतमध्ये उतरवून नाल्याच्या आतील भागात फिरवण्यात आली. त्यामुळे गाळ ढवळून निघून पाण्याचा प्रवाह मोकळा झाला. परंतु गाळ बाहेर मात्र काढण्यात आला नाही. परिणामी वाहून आलेला गाळ पुन्हा या नाल्यात अडकला. 

- आकाश सरवदे, स्थानिक रहिवासी 

या नाल्याची सफाईच योग्यप्रकारे न झाल्यामुळे कमला रामननगरमधील सर्व घरांमध्ये पाणी तुंबण्याची शक्यता आहे. या नाल्यामध्ये जर पाणी तुंबले तर माटुंगा रेल्वे रुळावरही पाणी जमा होऊन गाड्या बंद होण्याची भीती अशोक सरवदे याांनी यावेळी व्यक्त केली. विशेष म्हणजे ही बाब महापालिका अधिकाऱ्यांच्या लक्षात आणल्यानंतरही त्यांनी लक्ष दिले नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, याबाबत पर्जन्य उपजलअभियंता खेडकर यांना विचारले असता त्यांनी या नाल्याची सफाई झाल्याचे सांगत आपण स्वत: या नाल्याची पाहणी करू, असे आश्वासन 'मुंबई लाइव्ह'ला दिले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा