Advertisement

कधी पूर्ण होणार दादर फूल मार्केटच्या ब्रिजचे काम?


कधी पूर्ण होणार दादर फूल मार्केटच्या ब्रिजचे काम?
SHARES

दादर फूल मार्केटमधील ब्रिज गेल्या काही दिवसांपासून नादुरुस्त झाल्यामुळे नागरिकांना त्रासाा सहन करावा लागत आहे. मुंबईतल्या महत्वाच्या रेल्वे स्थानकांपैकी दादर हे महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. दादरमध्ये सेंट्रल आणि वेस्टर्न या देन्ही मार्गाचे लोक सतत ये-जा करतात. तसेच दादर ही शहरातली मुख्य बाजारपेठ मानली जाते. त्यामुळे या स्टेशनला जास्त गर्दी असल्याचे चित्र नेहमीच पाहायला मिळते. मात्र दादर फूलमार्केटमधून दादर टीटीला जाण्यासाठी वापरला जाणारा पा़दचारी पूल दुरुस्तीच्या कारणामुळे गेले अनेक महिने बंद ठेवण्यात आला होता. हा ब्रिज मोडकळीस आल्यामुळे अपघात होऊ नये म्हणून ब्रिजची दुरुस्ती करणार असल्याची माहिती पालिकेकडून वारंवार देण्यात येत होती. 

गणेशोत्सव,नवरात्र झाल्यानंतर दिवाळी दरम्यान या कामाचा महापालिकेने शुभारंभ केला खरा मात्र अचानक या ब्रिजचे काम अर्धवट सोडण्यात आले. त्यामुळे सध्या नागरिक ये-जा करण्यासाठी जुन्याच ब्रिजचा वापर करतात. त्यातच हा ब्रिज मुख्य मार्केटमध्ये आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासी आणि नागरीक देखील या पुलाचा वापर करतात. हा मुख्य ब्रिज असल्यामुळे वेळेत दुरुस्ती होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गणेशोत्सवापासून अजूनही याची दुरुस्ती न झाल्यामुळे लोकांना अ़डचणींचा सामना करावा लागत आहे.

अर्धवट स्वरुपात असलेल्या या ब्रिजची दुरुस्ती कधी होणार? या संदर्भात पूल प्रमुख अभियंता शितलाप्रसाद राम कोरी यांच्याशी संवाद साधला असता कोरी यांनी ब्रिजचे बांधकाम करताना काही मुलभूत  अडचणी येत आहेत असे सांगितले. या ठिकाणी पाण्याची पाईपलाइन आडवी येत असल्यामुळे बांधकामाला विलंब लागत आहे. परंतु या कामाला आम्ही परत सुरूवात करत आहोत. त्या ब्रिजचा आराख़़डा तयार आहे. लवकरच प्रवाशांना सोईस्कर असा ब्रिज तयार करण्यात येईल असंही त्यांनी म्हटलं आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा