• नाल्यातील घाणीमुळे नागरिक त्रस्त
  • नाल्यातील घाणीमुळे नागरिक त्रस्त
SHARE

पावसाळ्यापूर्वी मुंबईत पालिकेकडून नालेसफाईचं काम मोठ्या प्रमाणात हाती घेतलं जातं. मुंबईत काही ठिकाणी नालेसफाईला सुरुवात देखील झाली आहे. मात्र दहिसर पूर्व परिसरातील एस् व्ही रोड येथील डायमंड इंडस्ट्रियल इस्टेटच्या बाजूला असलेला नाला याला अपवाद ठरलाय.हा नाला पूर्णपणे भरला तरी देखील पालिका कर्मचारी याकडे दुर्लक्ष करताना पहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे 3 दिवसांपूर्वी नाला साफ केला खरा पण नाल्यातली घाण तिथेच ठेवल्याने नाला पुन्हा घाणीने भरला. या सगळ्यामुळे स्थानिक पुरते हैराण झाले आहेत. याबाबत स्थानिक संतोष पारिक यांनी पालिकेच्या आर उत्तर विभागाला तक्रार देखील केली. मात्र त्यांच्या तक्रारीकडे पालिकेकडून दुर्लक्ष केल्याचं त्यांनी सांगितले. याबाबत 'मुंबई लाइव्ह'च्या प्रतिनिधींनी पालिकेच्या देखभाल विभागाचे अधिकारी गणेश मुंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या