Advertisement

मुंबई पोलिसांवर देखील Money Heist ची जादू, Bella Ciao गाण्यावर केला जबरदस्त परफॉर्मन्स

आपल्या हटके आणि अनोख्या ट्वीटमुळे अनेकदा मुंबई पोलीस चर्चेत असतात.

मुंबई पोलिसांवर देखील Money Heist ची जादू, Bella Ciao गाण्यावर केला जबरदस्त परफॉर्मन्स
SHARES

आपल्या हटके आणि अनोख्या ट्वीटमुळे अनेकदा मुंबई पोलीस चर्चेत असतात. 'जगप्रसिध्द चोरी' दाखवण्यात आलेल्या मनी हाईस्टच्या पाचव्या सीजनचा पहिला भाग नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आला. भारतात देखील या सिरीजची क्रेझ पाहायला मिळाली आहे. या सिरिजची क्रेझ मुंबई पोलिसांमध्ये देखील पाहायला मिळत आहे.

मुंबई पोलिसांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्या व्हिडीओमध्ये मनी हाईस्टच्या बेला चाओ (Bella Ciao) या सुप्रसिद्ध गाण्यावर इंस्ट्रूमेंट वर्जन सादर केला आहे. मुंबई पोलिसांच्या या परफॉर्मन्सचे नेटकऱ्यांनी खूप कौतुक केलं आहे. मुंबई पोलिसांच्या या बँडला खाकी स्टुडिओ या नावानं ओळखलं जातं.

बेला चाओ (Bella Ciao) एक इटालियन फॉर्मर प्रोटेस्ट गाणे आहे. मुंबई पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून गाण्याचा सराव करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन देखील लिहिलं आहे, " आम्ही कायमच ट्रेंड्स फॉलो करण्याचा प्रयत्न करतो". नेटफ्लिक्स इंडियानं देखील मुंबई पोलिसांच्या या व्हिडीओवर कमेंट केली आहे.

मनी हाईस्ट एक क्राईम थ्रिलर वेबसीरीज आहे. बऱ्याच दिवसांपासून चाहते या वेबसीरिजची वाट पाहत आहेत. ५व्या  सीझनमध्ये  मध्ये एकूण दहा एपिसोड्स असणार आहेत. पण, हे एपिसोड दोन भागांत रिलीज केले जाणार आहेत.

पहिला भाग 3 सप्टेंबरला रिलीज करण्यात आला. परंतु, दुसऱ्या भागासाठी चाहत्यांना आणखी वाट पाहवी लागणार आहे. दुसरा भाग 3 डिसेंबरला रिलीज करण्यात येणार आहे.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा