Advertisement

विमानतळावर मास्क वापरणं अनिवार्य

यासोबतच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

विमानतळावर मास्क वापरणं अनिवार्य
(Representational Image)
SHARES

नागरी विमान वाहतूक महासंचालक (DGCA) ने कोरोना संसर्ग लक्षात घेऊन विमानतळांसाठी नवीन नियम लागू केले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डीजीसीएने नवीन नियम जारी केले आहेत.

नवीन नियमांमध्ये, DGCA ने हवाई प्रवासादरम्यान मास्क अनिवार्य केले आहेत. आता केवळ अपवादात्मक परिस्थितीतच मास्क काढण्याची परवानगी दिली जाईल.

यासोबतच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, उल्लंघन करणाऱ्यांना ‘नो फ्लाय लिस्ट’मध्ये टाकले जाऊ शकते.

विमानातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मास्क वापरणं अनिवार्य केलं आहे. तसेच नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर योग्य ती कारवाई करण्याचा आदेश डीजीसीएकडून देण्यात आला आहे.

विमान प्राधिकरणाने कर्मचारी, सुरक्षा जवानांना सक्तीनं याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. मास्क न घालणाऱ्या प्रवाशांवर दंडही आकारला जाऊ शकतो.

गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने डीजीसीएच्या कामकाजावर ताशेरे ओढले होते. त्यानंतर विमानतळावर कोरोना नियम कठोर करण्यात आले आहेत.

बुधवारी ८ जून रोजी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमानतळ आणि विमान कंपन्यांना निर्देश दिले आहेत. मास्क घालण्यासह कोविड-१९ च्या इतर नियमांचं काटेकोर पालन करावं, असं संबंधित आदेशात म्हटलं आहे.

तसंच विमानतळ परिसरात आणि विमान प्रवासात मास्क घालण्यास नकार देणार्‍या किंवा कोविड-१९ प्रोटोकॉलचं उल्लंघन करणार्‍या प्रवाशांवर कारवाई करण्याचे आदेश विमान कंपन्यांना देण्यात आले आहेत.

याशिवाय मास्क परिधान न करणाऱ्या नागरिकांना विमानतळ परिसरात प्रवेश न देण्याचे आदेशही केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि इतर पोलीस कर्मचार्‍यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे येथून पुढे मास्कशिवाय विमानतळ परिसरात प्रवेश मिळणार नाही.

वारंवार सांगूनही नियमांचे पालन करत नसेल तर संबंधित प्रवाशाला उड्डाण घेण्यापूर्वीच विमानातून खाली उतरण्यात येईल. तसेच कोविड नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.



हेही वाचा

सोसायटीच्या मजल्यावर कोरोना रुग्ण सापडल्यास...ठाणे आयुक्तांचे आदेश

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा