
मुंबईतील बेस्ट बससेवा थेट रेल्वे व मेट्रो स्थानकांना जोडण्यात येणार आहे. अंधेरी (andheri), जोगेश्वरी (jogeshwari), कुर्ला (kurla), वांद्रे, कांदिवली व बोरिवली (borivali) यांसारख्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांपर्यंत पोहोचणे आता सोपे होणार आहे.
तसेच, मेट्रो मार्गिका 1, 2 ए, 7 आणि 3 (Aqua line) या प्रमुख मेट्रो मार्गांशीही या नवीन बससेवा जोडल्या जाणार आहेत. या नव्या सोयीमुळे दररोज 2 लाख प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे.
मुंबईतील (mumbai) प्रवाशांचे जीवनमान सुकर करण्यासाठी प्रशासनाकडून या नवीन बससेवा सुरू करण्यात येत आहेत. या सेवांमुळे रेल्वे स्थानके व मेट्रो स्टेशनपर्यंत पोहोचणं अधिक सोयीचं होणार आहे.
विशेषतः, अंधेरी पश्चिम, जोगेश्वरी पश्चिम, कुर्ला पूर्व व पश्चिम, वांद्रे पश्चिम, कांदिवली पश्चिम व बोरिवली पश्चिम यांसारख्या गर्दीच्या उपनगरीय रेल्वे स्थानकांना थेट जोडलं जाणार आहे.
या बससेवा केवळ रेल्वे स्थानकांनाच नाही, तर मुंबईतील प्रमुख मेट्रो मार्गांनाही (metro line) जोडणार आहेत. यामध्ये मेट्रो मार्गिका क्रमांक 1, 2 ए, 7 आणि 3 (अॅक्वा लाइन) यांचा समावेश आहे.
आता प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध होतील. या सुधारणांमुळे दररोज सुमारे 1 लाख 90 हजार प्रवाशांना फायदा होण्याची अपेक्षा आहे.
यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल. तसेच गर्दीच्या वेळी होणारा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे. नवीन इलेक्ट्रिक बस ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग प्रवाशांसाठी खास सुविधांसह दाखल झाली आहे.
या बसमध्ये (bus) चढण्यासाठी रॅम्पची सोय असल्याने त्यांना प्रवास करणं सोपं होणार आहे. बसची आसन क्षमता 39 असून, 20 प्रवासी उभे राहू शकतात. प्रवाशांच्या सोयीसाठी बसमध्ये पंखेही बसवण्यात आले आहेत.
बसच्या मधल्या भागात आडव्या बाजूला तीन आसने असूनमागील बाजूस असलेला आपत्कालीन निर्गमन मार्ग आता बंद करण्यात आला आहे.
परंतु, बसच्या दोन्ही बाजूंना असलेल्या सर्व खिडक्या आपत्कालीन मार्ग म्हणून वापरता येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात आली आहे.
हेही वाचा
