Advertisement

राज्यात आज ७ हजार जणांना डिस्चार्ज


राज्यात आज ७ हजार जणांना डिस्चार्ज
SHARES

राज्यात दैनंदिन आढळून येणारी कोरोनाबाधितांची पाच अंकी संख्या चार अंकी झाली आहे. आज दिवसभरात ७ हजार ८९ रुग्ण आढळून आले तर त्याच्या दुप्पट १५ हजार ६५६ रुग्ण बरे होऊन घरी  गेले.  रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८३.४९ टक्के एवढे झाले आहे. राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी होऊन २ लाख १२ हजार ४३९ एवढी कमी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

हेही वाचाः- MPSC परीक्षा पुढे ढकलताना फक्त एकाच जातीचा विचार, बाकीच्याचं काय?- प्रकाश आंबेडकर

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७६ लाख ९७ हजार ९०६ नमुन्यांपैकी १५ लाख ३५ हजार ३१५ नमुने पॉझिटिव्ह ( १९.९४ टक्के) आले आहेत. राज्यात  २३ लाख  २३ हजार ७९१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २५ हजार ९५१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १६५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.

हेही वाचाः- खंडित वीज पुरवठ्यामुळे मुंबई विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलल्या

तर नवी मुंबईत सोमवारी (१२ ऑक्टोबर) कोरोनाचे नवीन २९४ रुग्ण सापडले आहेत. तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ४०,६३९ झाली आहे. सोमवारी बेलापूर ४७, नेरुळ ५२, वाशी ३०, तुर्भे ३२, कोपरखैरणे ३३, घणसोली ४१, ऐरोली ५१, दिघामध्ये ८  नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात २६७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर ५७, नेरुळ ४२, वाशी २८, तुर्भे ४६, कोपरखैरणे १३,  घणसोली ३५, ऐरोली ३८, दिघामधील ८ रुग्ण बरे झाले आहेत.  बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३६,४०६ झाली आहे. तर मृतांचा आकडा ८२३ झाला आहे. नवी मुंबईत सध्या ३४१० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ८९ टक्के झाला आहे. शहरात खासगी रुग्णालयातील करोना रुग्णांच्या देयकांच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. यासाठी पालिकेने पालिका मुख्यालयातील तळमजल्यावर विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. संपर्कासाठी ०२२२/ ७५६७३८९  किंवा ७२०८४९००१० या व्हॉटसअँप क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा