Advertisement

डाॅक्टर, वकील, इंजिनीअर धावताहेत पोलिस काॅन्स्टेबल होण्यासाठी!


डाॅक्टर, वकील, इंजिनीअर धावताहेत पोलिस काॅन्स्टेबल होण्यासाठी!
SHARES

मुंबईत सुरू असलेल्या पोलिस भरतीत इंजिनीअर, डॉक्टर, वकील आणि इतर पदवीधर सहभागी झाले आहेत. एवढं शिक्षण घेऊनसुद्धा दिवसरात्र उन्हातन्हाची तमा न बाळगता रस्त्यावर कायदा आणि सुवस्थेची जबाबदारी संभाळणाऱ्या पोलिस दलातच त्यांना का जावंसं वाटलं? हा प्रश्न उपस्थित होत आहे.


तरुणांच्या व्यथा

लातूरच्या निलंग्यात राहणाऱ्या लक्ष्मण वैजनाथ पांचाळ (२२) हा मागील मुंबईत पोलिस भरतीसाठी आला आहे. आई, वडील आणि लहान भाऊ असा त्यांचं कुटुंब आहे. त्याचं संपूर्ण घर शेतीवर अवलंबून आहे. मात्र कायम दुष्काळाचं सावट असलेल्या भागात शेती कशी करणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे दुसऱ्याच्याच रोजंदारीवर जाऊन हे कुटुंबिय आपला रोजचा खर्च भागवतात.

आपल्यावर आलेले दिवस पोरांच्या वाटेला येऊ नये. म्हणून पोटाला चिमटा काढून वैजनाख यांनी लक्ष्मणला इंजिनिअर बनवायचं ठरवलं. अभ्यासात हुशार असलेल्या लक्ष्मणने इंजिनीअरिंगचे २ वर्ष चांगल्या मार्काने उतीर्ण झाला खरा, मात्र तिसऱ्या वर्षाची फी भरण्यासाठी त्याच्याजवळ पैसेच नाहीत. शिक्षण घेऊनही गावाकडच्यांना कॉर्पोरेट क्षेत्रांमध्ये डावललं जातं. त्यात आजारांनी आई-वडील अंथरुणाला खिळले आहेत. त्यामुळे घराची संपूर्ण जबाबदारी लक्ष्मणवर पडल्यामुळे त्याने पोलिस दलाच्या सरकारी नोकरीचा फॉर्म भरल्याचे तो सांगतो.


'म्हणून पोलिस भरतीत नशीब आजमवलं'

दुसरीकडे बुलडाणाच्या सिंधखेडराजा येथून पोलिस भरतीत उतण्यासाठी आलेला ऋषीकेश खरात (२६) हा बीएससीत चांगल्या मार्कांनी पास झाला आहे. त्याच्या घरची परिस्थिती बेताची आहे. एक दिवस कामाला न गेल्यास घरात चुल पेटत नाही. जमीन अवघी एक एकर मात्र दुष्काळामुळे जमिनीत कोणतेही पीक घेत नाही. इकडे तिकडे मजुरी करून तो आपले घर चालवतो. एक दिवस कामाला न गेल्यास घरात खायला अन्न मिळणे मुश्किल ही परिस्थिती आहे.

डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत शिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी करण्याचं त्याने ठरवलं होतं. मात्र बीएससी झाल्यानंतर पुढे शिक्षण घेण्यासाठी कॉलेजमध्ये लाखभर रुपयांच्या डोनेशनची मागणी केली जाते. शिक्षण घेण्यासाठी खिशात दमडी शिल्लक नसल्यामुळे त्याने शिक्षण अर्धवट सोडून नशीब आजमवण्यासाठी पोलिस भरतीत उतरल्याचं तो सांगतो. ही सरकारी नोकरी मिळाल्यास घरातील सर्व स्वप्न पूर्ण होतील, असं त्याने सांगितलं.


अनेक पदवीधारकांनी केले अर्ज

या दोघांसारखे उच्चशिक्षित तरुणांची संख्या पोलिस भरतीमध्ये लक्षणीय आहे. पोलीस शिपाईपदाच्या भरतीसाठी ४२३ इंजिनीयर्स, १६७ एमबीए, ५४३ एम. कॉम, २८ बीएड पदवीधारक, ३४ एमसीए, २५ मास मीडिया अॅण्ड कम्युनिकेशन्स, ३ बीएएमएस. १६७ बीबीए आणि ३ एलएलबी पदवीधारक आपले नशीब आजमवण्यासाठी अर्ज केले आहेत.



हेही वाचा-

निलंबित पोलिस शिपायानेच चोरली काडतुसे

जेव्हा, पोलिसालाच जडतो चोरीचा छंद..!



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा