जेव्हा, पोलिसालाच जडतो चोरीचा छंद..!

अक्षयला राजारामवाडीतील चाळीत संशयास्पदरित्या घुटळमळताना प्रतिक वरखडे याने पाहिलं. प्रतिक त्याला विचारायला जाणार तोच रात्रीच्या अंधारात अक्षय दिसेनासा झाला. पहाटे प्रतिकची आई तिचा मोबाइल मिळत नसल्यामुळे शोधाशोध करत असताना घरात चोरी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यावेळी प्रतिकने भोईवाडा पोलिसांत तक्रार केली. प्रतिकने पोलिसांना चोराचं वर्णन केल्यावर अक्षयची ओळख पोलिसांना पटली.

जेव्हा, पोलिसालाच जडतो चोरीचा छंद..!
SHARES

“दे धक्का” या मराठी सिनेमात अभिनेता सिद्धार्थ जाधवने ‘क्लेप्टो मेनिया’ आजाराने त्रस्त होऊन चोरी करण्याचा छंद जडलेल्या व्यक्तीचं पात्र रंगवलं होतं. या पात्राशी मिळत्या जुळत्या एका चोराला भोईवाडा पोलिसांनी गुरूवारी सकाळी अटक केली. हा चोर दुसरा तिसरा कुणीही नसून चक्क निलंबित पोलिस शिपाई असल्याचं तपासात पुढं आलं आहे. अक्षय चौघुले असं या आरोपीचं नाव असून त्याच्यावर या पूर्वीही चोरीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचं पोलिसांनी सांगितलं.


कशी जडली सवय?

भोईवाडा येथील सदाकांत ढवण मैदानजवळील बीडीडी परिसरात राहणारा अक्षय चौघुले हा सुशिक्षित घरातला तरूण मित्रांच्या वाईट संगतीने चोऱ्या करू लागला. पोलिस दलात कार्यरत असलेल्या वडिलांचं निधन झाल्यावर विशेष बाब म्हणून अक्षयला वडिलांच्या जागी पोलिस दलात नोकरी मिळाली. तरीसुद्धा अक्षयची चोरी करण्याची सवय जात नव्हती. रात्रभर घराबाहेर राहणाऱ्या आणि वाईट संगतीत असलेल्या अक्षयवर कुटुंबातील एकाही व्यक्तीचा अकुंश नव्हता.


'असं' झालं निलंबन

दरम्यान रफी अहमद किडवाई पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात काही दिवसांपूर्वी पोलिस शिपाई असलेल्या अक्षयने एका महिलेच्या घरात चोरी केली. या चोरीत अक्षयला पोलिसांनी रंगेहाथ पकडल्यानंतर त्याला पोलिस दलातून निलंबित करण्यात आलं. परंतु एवढी मोठी अद्दल घडूनसुद्धा अक्षय चोरीचा मार्ग सोडण्यास तयार नव्हता.



सापडला पोलिसांच्या तावडीत

बुधवारी मध्यरात्री अक्षयला राजारामवाडीतील चाळीत संशयास्पदरित्या घुटळमळताना प्रतिक वरखडे याने पाहिलं. प्रतिक त्याला विचारायला जाणार तोच रात्रीच्या अंधारात अक्षय दिसेनासा झाला. पहाटे प्रतिकची आई तिचा मोबाइल मिळत नसल्यामुळे शोधाशोध करत असताना घरात चोरी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यावेळी प्रतिकने भोईवाडा पोलिसांत तक्रार केली. प्रतिकने पोलिसांना चोराचं वर्णन केल्यावर अक्षयची ओळख पोलिसांना पटली.


गुन्ह्याची कबुली

त्यानुसार पोलिस अक्षयच्या घरी पोहोचले. सुरूवातीला अक्षय गुन्ह्यांची कबुली देत नव्हता. अखेर पोलिसांनी खाकीचा धाक दाखवल्यानंतर अक्षयने आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली. या प्रकरणी अक्षयवर पोलिसांनी भा.द.वि कलम ३८० अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.

अक्षयला या पूर्वीही अनेकदा चोरी करताना पोलिसांनी पकडलं होतं. मात्र त्याला समज देऊनही अक्षयच्या वागण्यात काहीच फरक पडत नव्हता. त्याच्या या वागण्यामुळे पोलिस दलाचं नाव खराब होत असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.



हेही वाचा-

ग्रँट रोडमध्ये दोन महिला इमारतीवरून पडल्या, एकीचा जागीच मृत्यू

कमला मिल आग: १ अबोव्हच्या मॅनेजर्सला जामीन



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा