Advertisement

१५ डिसेंबरपासून दुधाच्या पिशव्या बंद

दुसरीकडे प्लास्टिक पिशव्या नसतील, तर दूध संकलन कसं करायचं? असा सवाल करत डेअरी उत्पादकांनी शेतकऱ्यांकडून दूध संकलित न करण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा दूध आणि दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांचा प्रश्न येत्या काळात चिघळण्याची शक्यता आहे.

१५ डिसेंबरपासून दुधाच्या पिशव्या बंद
SHARES
Advertisement

'द महाराष्ट्र प्लास्टिक मॅन्युफक्चर्स असोसिएशन'ने १५ डिसेंबरपासून डेअरी उद्योगाला प्लास्टिक पिशव्यांचा पुरवठा न करण्याचा निर्णय घेतला आहे. प्लास्टिक पिशव्यांची विल्हेवाट, पुनर्वापर आणि प्रक्रिया करण्यासाठीचा आराखडा प्लास्टिक उत्पादकांना करता आलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टिक उत्पादकांना प्लास्टिक पिशव्यांच उत्पादन बंद करण्याच्या नोटीसा पाठवल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर १५ डिसेंबरपासून डेअरी उद्योगाला प्लास्टिक पिशव्या न पुरवण्याचा निर्णय प्लास्टिक उत्पादकांनी घेतला आहे.


दूध संकलन कसं करायचं?

दुसरीकडे प्लास्टिक पिशव्या नसतील, तर दूध संकलन कसं करायचं? असा सवाल करत डेअरी उत्पादकांनी शेतकऱ्यांकडून दूध संकलित न करण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा दूध आणि दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांचा प्रश्न येत्या काळात चिघळण्याची शक्यता आहे.


आराखडा सादर करण्याचे आदेश

राज्य सरकारने प्लास्टिक बंदी लागू केली असून त्याअंतर्गत दुधाच्या पिशव्यांवरही बंदी आली आहे. त्यानुसार दुधाच्या पिशव्यांची विल्हेवाट लावावी तसंच दुधाच्या पिशव्यांचा पुनर्वापर करण्यासंबंधीचा आराखडा सादर करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टिक उत्पादकांना दिले होते.


उत्पादन बंद

हा आराखडा प्लास्टिक उत्पादकांना सादर न करता आल्यानं प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टिक उत्पादकांना नोटीसा बजावल्या आहेत. या नोटीशीनुसार प्लास्टिक पिशव्यांचं उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळं आता १५ डिसेंबरपासून दुधासाठी डेअरीवाल्यांना पिशवी उपलब्ध होणार नाही. तेव्हा दूध संकलनाचा मोठा प्रश्न डेअरी उत्पादकांसमोर उभा ठाकला आहे.


बैठकीचं आयोजन

दरम्यान दूध उत्पादकांनी दूध व्यवसायाला वगळावं अशी मागणी केली आहे. तर दुधाला पिशवी उपलब्ध न झाल्यास दूध संकलन न करण्याचा, शेतकऱ्यांकडून दूध न घेण्याचा इशारा डेअरी उत्पादकांनी दिला आहे. त्याचवेळी राज्यभरातील दूध उत्पादकांनी एकत्र येत गुरूवारी एक बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत दूध उत्पादक नेमकी काय भूमिका घेतात हेच पाहणं महत्त्वाचं ठरेल.हेही वाचा-

प्लास्टिक बंदी : सव्वा लाख दुकानांची चाचपणी

प्लास्टिक बंदीतील चूक ‘फेरीवाला’त सुधारणार, नगरसेवकांना विश्वासात घेऊनच कामसंबंधित विषय
Advertisement