Advertisement

प्लास्टिक बंदी : सव्वा लाख दुकानांची चाचपणी


प्लास्टिक बंदी : सव्वा लाख दुकानांची चाचपणी
SHARES

संपूर्ण राज्यभरात २३ जून रोजी प्लास्टिक बंदी लागू करण्यात आल्यानंतर मुंबई महापालिकेच्या पथकांनी सर्वच छोट्या-मोठ्या दुकानांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत एक महिन्यांच्या कालावधीतच सुमारे सव्वा लाख दुकानांची चाचपणी करण्यात आली आहे. यामध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर करण्यात येणाऱ्या दुकानांच्या मालक तसेच चालकांकडून आकारण्यात येणारा दंड देण्यात न आल्यामुळे आतापर्यंत १९५ दुकानदार तसेच गाळेधारकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


पाच हजारांचा दंड

प्लास्टिक पिशव्यांवरील कारवाईसाठी महापालिकेनं नियुक्त केलेल्या पथकामार्फत दुकान, मॉल्स आणि मंडईतील गाळ्यांची तपासणी केली जात आहे. आतापर्यंत केलेल्या तपासणीमध्ये एकण १ लाख २६ हजार ६९१ दुकान व गाळ्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. ज्यांच्याकडे प्लास्टिक पिशव्यांचा साठा आढळून आला, अशा दुकान व गाळेधारकांना पाच हजारांचा दंड आकारण्यात अाला आहे. त्यामुळे आतापर्यंत ५४ लाख ६५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांनी दिली आहे.


१९५ दुकानदारांवर गुन्हे दाखल

दंडाची रक्कम न दिलेल्या १९५ दुकानदार व गाळेधारकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून आतापर्यंत एकूण ७३०७.७० किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. जप्त करण्यात आलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा साठ्याचा लिलाव करून त्यांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे.


सपानं केली ही मागणी

मुंबईत प्लास्टिक पिशवी व थर्माकोलवर बंदी असली तरी गणेशोत्सवात थर्माकोल वापरण्यास सरकारनं सवलत दिली आहे. त्याच धर्तीवर मुस्लिमधर्मियांच्या बकरी ईदच्या सणात कुर्बानीनंतरचं बकऱ्याचं टाकाऊ मांस, कातडं गोळा करून प्लास्टिक पिशव्यांमधून वाहून नेण्यासाठी काळ्या प्लास्टिक पिशव्या वापरण्यास सूट दिली जावी, अशी मागणी सपाचे गटनेते रईस शेख यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम, महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.


रईस शेख यांची पत्राद्वारे मागणी

गणेशोत्सवात यंदा थर्माकोल वापरण्यास सवलत दिली आहे, याचं आम्ही स्वागतच करतो. परंतु बकरी ईदच्या सणात बकऱ्याची कुर्बानी दिल्यांनंतर बकऱ्याचे टाकाऊ भाग प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरले जाते. जेणेकरून त्याचे रक्त किंवा अन्य भाग कुठेही सांडले जाऊ नये. पर्यावरणाचा विचार करता अशाप्रकारच्या काळ्या प्लास्टिक पिशव्या या आवश्यक असून सरकारनं यामध्ये पुढाकार घेऊन त्वरित याबाबतचे आदेश महापालिकेला द्यावेत, अशी मागणी रईस शेख यांनी आपल्या पत्राद्वारे केली आहे.


हेही वाचा -

गणेशगल्ली साकारणार इकोफ्रेंडली सूर्यमंदिर

प्लॅस्टिक पिशवी घेऊन या, रोपटं घेऊन जा



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा