Advertisement

मुंबईतील वाहतूक कोंडीवर डबलडेकर टनेलचा पर्याय काळाची गरज : मुख्यमंत्री

यासाठी वर्षा बंगल्यावर बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डबल डेकर टनल काळाजी गरज असल्याचे वक्तव्य केले.

मुंबईतील वाहतूक कोंडीवर डबलडेकर टनेलचा पर्याय काळाची गरज : मुख्यमंत्री
SHARES

मुंबईतील ट्राफिक (Mumbai Traffic) समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर तोडगा म्हणून मुंबईसाठी डबलडेकर टनेलचा (Double Decker Tunnel) पर्याय अवलंबण्याचा विचार केला जात आहे. यासाठी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात आली.

मुंबईसाठी डबलडेकर टनेलचा (Double Decker Tunnel) पर्याय अवलंबण्यासाठी वरिष्ठ सनदी अधिकारी आणि एकात्मिक वाहतूक प्रणाली यंत्रणा तयार करणाऱ्या तंत्रज्ञांनी बैठक घ्यावी त्याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

मल्टी मॉडेल इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्टेशन नेटवर्क टनेलच्या माध्यमातून डबल डेकर टनेल साकारण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी सादरीकरण देखील करण्यात आले.

एमएमआरडीए क्षेत्र एकात्मिक वाहतूक प्रणालीद्वारे जोडून वाहतूक कोंडी कमी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. मुंबईसाठी मल्टीडेक टनेल काळाची गरज असून त्याचा अभ्यास करण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवासन, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी तांत्रिक टीम सोबत बैठक घेतली. या एकात्मिक वाहतूक प्रणालीबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

यावेळी आमदार राजेंद्र पटणी, महापालिका आयुक्त आय. एस. चहल, एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवासन, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, पी. वेलारासू आदी यावेळी उपस्थित होते.



हेही वाचा

मेट्रो 11 मध्ये ईस्टर्न फ्रीवे ते मरीन ड्राईव्हपर्यंत भूमिगत बोगदा बनणार

TATA Mumbai Marathon 2023: मार्ग आणि वेळ याबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा