Advertisement

२४ तास उलटूनही बॉम्बे हॉस्पिटलचे वरिष्ठ डॉ. दीपक अमरापूकर बेपत्ताच


२४ तास उलटूनही बॉम्बे हॉस्पिटलचे वरिष्ठ डॉ. दीपक अमरापूकर बेपत्ताच
SHARES

तब्बल २४ तास उलटून गेले तरी बॉम्बे हॉस्पिटलचे पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांचा शोध लागलेला नाही. मंगळवारी मुसळधार पाऊस कोसळत असताना अमरापूरकर बॉम्बे हॉस्पिटलमधून दुपारी आपल्या घराच्या दिशेने जाण्यास निघाले. पण, ते घरी पोहोचलेच नाही. अमरापूरकर परळमधील मॅनहोलमध्ये पडल्याचे म्हटले जात असून सध्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. अमरापूरकर यांच्या घरी यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे.

मंगळवारी पडलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईकरांचे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले. रेल्वे, बस, टॅक्सीसह सर्व वाहतूक बंद झाल्याने मुंबईकरांनी रस्त्यावर साचलेल्या पाण्यातूनच वाट काढत आपले घर गाठण्याचा प्रयत्न केला. आपल्या गाड्या अनेक जण रस्त्यावर सोडून चालत घरी जात निघाले.



नेमके काय झाले?  

प्रभादेवीला राहणारे डॉ. अमरापूरकर देखील दुपारी ४.३० च्या दरम्यान बॉम्बे हॉस्पिटलमधून घरी ज् निघाले. लोअर परळ येथील इंडिया बुल्सजवळ त्यांनी आपली गाडी थांबवली. त्यानंतर, १० मिनिटांच्या अंतरावर घर असल्याने 'मी चालत जाईन' असे म्हणत ते गाडीतून उतरले. पण, अजूनही त्यांचा काहीच शोध लागलेला नाही, अशी माहिती बॉम्बे हॉस्पिटलमधील डॉ. अनिल शर्मा यांनी दिली. ज्या ठिकाणी ते उतरले तेथील मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडल्याचे काही जणांनी पाहिले. शिवाय त्यांची छत्री सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे, असेही डॉ. शर्मा यांनी सांगितले.


डॉ. अमरापूरकर दुपारी हॉस्पिटलमधून निघाले. संध्याकाळी ते एलफिन्स्टन भागातील दीपक टॉकीजजवळ पोहचले. रस्त्यावर पाणी असल्याने त्यांनी ड्रायव्हरला गाडी न्यायला सांगितली. त्यानंतर ते गाडीतून उतरले आणि चालत निघाले. त्यांचा ड्रायव्हर घरी पोहोचला, पण डॉ. अमरापूरकर कुठे आहेत याचा काहीच अंदाज नाही. शिवाय, त्यांनी संध्याकाळी ६.३० च्या दरम्यान पत्नीला फोन केला आणि आपण पायी येत आहोत, असे सांगितले होते.

- डॉ. गौतम भन्साळी, फिजीशिअन, बॉम्बे हॉस्पिटल


मंगळवारच्या संध्याकाळपासूनच पोलिस, महापालिका आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी संपर्कात असल्याचेही डॉ. भन्साळी यांनी सांगितले. सर्व रुग्णालयांमध्ये विचारण्यात आले आहे. पण, अजूनही त्यांच्याबाबत काहीच माहिती मिळाली नाही. संध्याकाळी डॉ. अमरापूरकर बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर गेल्या २४ तासांपासून शोधमोहीम सुरू आहे.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा