Advertisement

विरुद्ध दिशेनं वाहन चालवल्यानं ३५ जणांवर गुन्हा दाखल

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी विरुद्ध दिशेने वाहने चालवणाऱ्या चालकांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश देताच वाहतुक पोलिसांकडून कारवाईला सुरूवात झाली आहे.

विरुद्ध दिशेनं वाहन चालवल्यानं ३५ जणांवर गुन्हा दाखल
SHARES

मुंबईकरांनो तुम्ही जर रस्त्यावर विरुद्ध दिशेनं वाहन चालवत आसाल तर वेळीच सावध व्हा, अन्यथा कडक कारवाईला सामोरं जावं लागेल. कारण विरुद्ध दिशेनं वाहनं चालवणाऱ्या चालकांविरोधात आता थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबई पोलिसांना दिले आहेत. मात्र तरीही अनेक मुंबईकर या आदेशाचे पालन करत नाही आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विरुद्ध दिशेनं वाहन चालवल्यानं सोमवारी एकूण ३५ जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले.

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी विरुद्ध दिशेने वाहने चालवणाऱ्या चालकांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश देताच वाहतुक पोलिसांकडून कारवाईला सुरूवात झाली आहे. त्यानुसार, सोमवारी वन वे कारवाई (५६४), पार्किंग नियम उल्लंघन (२०४७), सीट बेल्टचा वापर न करणे (६५८), विनाहेल्मेट (२८६४), बेवारस वाहने उचलणे (२२६) तसेच विना परमिट वाहन चालविल्याप्रकरणी ७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

मुंबईत अनेकदा वाहनचालक विरुद्ध दिशेनं (Wrong Way) गाडी चालवतात. निश्चित स्थळ वळेत गाठण्यासाठी अनेकदा हे दुचाकीस्वार विरुद्ध दिशेनं गाडी चालवतात. शिवाय गाडीचा वेगही यावेळी जास्त असतो. त्यामुळं अपघात होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळं विरुद्ध दिशेनं वाहनं चालवणाऱ्या चालकांवर आता बेदरकारपणे गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त पांडे यांनी रविवारी दिली. तसंच, विरुद्ध दिशेन गाडी चालवू नये, असे आवाहनही या वेळी पांडे यांनी केले.

पोलीस आयुक्त संजय पांडे हे दर रविवारी मुंबईकरांशी फेसबुकद्वारे संवाद साधत असून आठवड्याच्या कामांची माहिती मुंबईकरांना देत आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा