Advertisement

मुंबईतील माझगावची हवा दिल्लीहून खराब


मुंबईतील माझगावची हवा दिल्लीहून खराब
SHARES

बदलत्या वातावरणामुळं मुंबईसह उपनगरातील हवा सातत्यानं खराब नोंदविण्यात येत आहे. सकाळी उकाडा रात्री थंड वातावरणामुळं रहिवाशी हैराण झाले असतानाच, गुरुवारी माझगाव (Mazgaon) येथील हवा दिल्लीपेक्षाही (Delhi) खराब नोंदविण्यात आल्यानं मुंबईकरांच्या त्रासात मोठी भर पडली आहे. गुरुवारी संध्याकाळी माझगाव येथील हवेच्या गुणवत्तेची (Air quality) नोंद ४५२ पार्टीक्युलेट मॅटर इतकी झाल्याची माहिती समोर येत आहे.

हवेच्या गुणवत्तेची नोंद ४५२ पार्टीक्युलेट मॅटर इतकी झाल्यानं अभ्यासकांनी आयआयटीएमच्या (IITM) मदतीनं याचा आढावा घेतला. त्यावेळी तेथील हवेची गुणवत्ता मोजत असलेल्या उपकरणांत त्रुटी असल्यानं अयोग्य नोंद होत असल्याचं निदर्शनास आलं. उपकरणातील ही त्रुटी दुरुस्त केल्यानंतर पुन्हा एकदा येथील हवेची नोंद घेण्याचं काम सुरू झालं आहे.

आयआयटीएमतर्फे (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ ट्रॉपिकल मेटोरोलॉजी) मुंबई आणि उपनगरात १० ठिकाणी हवेची गुणवत्ता मोजणारी उपकरणं बसविण्यात आली आहेत. कुलाबा, वरळी, माझगाव, बीकेसी, अंधेरी, मालाड, बोरीवली, भांडुप, चेंबूर आणि नवी मुंबई इथं ही उपकरणं आहेत. त्यांच्या माध्यमातून येथील हवेची गुणवत्ता पार्टीक्युलेट मॅटरमध्ये मोजली जाते.

माझगाव येथील हवा प्रदूषणानं गुरुवारी कहर केल्यानंतर येथील बांधकामांत वाढ झाल्यानं आणि रस्त्यांवरील वाहनांचे प्रमाण वाढल्यामुळे प्रदूषण वाढले असेल, असा तर्क सुरुवातीला लावण्यात आला.


हेही वाचा -

मेट्रोनंतर रेल्वे-एसटी करोनासाठी सज्ज

'इतक्या' महिला चालक एसटी सेवेत होणार दाखल



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा