Advertisement

पुरामुळं महागली साखर! ४० रुपये किलोवर गेले दर

मुसळधार पावसामुळं पश्चिम महाराष्ट्रातील काही कोल्हापूर, सांगली भागांत निर्माण झालेल्या पुरस्थितीचा फटका आता साखरेच्या पुरवठ्यावर झाल्याची माहिती समोर येत आहे.

पुरामुळं महागली साखर! ४० रुपये किलोवर गेले दर
SHARES

मुसळधार पावसामुळं पश्चिम महाराष्ट्रातील काही कोल्हापूर, सांगली भागांत निर्माण झालेल्या पुरस्थितीचा फटका आता साखरेच्या पुरवठ्यावर झाल्याची माहिती समोर येत आहे. मागील आठवड्यात २ रुपये महाग झालेली साखर होती. मात्र या आठवड्यात पुन्हा एकदा एक रुपयानं महागली आहे.

साखर साधारण ४० रुपये

पुराच्या आधी घाऊक बाजारात साखरेचा दर प्रती किलो ३२ रुपयांदरम्यान होता. मात्र, पुरामुळं हा दर आता ३४ ते ३५ रुपयांदरम्यान गेला आहे. उच्च दर्जाची साखर ३५.५० रुपये किलो आहे. नवी मुंबई ते मुंबईदरम्यान मालवाहतुकीचा दर १ रुपया प्रति किलो आहे. त्यानुसार आता किरकोळ बाजारात साखर साधारण ४० रुपयांदरम्यान गेली आहे.

मालवाहतूक सुरू

पूरग्रस्त भागातून मालवाहतूक सुरू असली, तरी अनेक ट्रक पुरात बुडल्यानं खराब झाले आहेत. सांगलीतील काही महत्त्वाची गोदामे, कराडमधील साखर मीलचं पुराच्या पाण्यानं नुकसान झाले आहे. त्यामुळं परिस्थिती सुरळीत होण्यास आणखी ८ ते १० दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.



हेही वाचा -

गणेशोत्सव २०१९: मंडपासाठी केवळ २६२० गणेशोत्सव मंडळांचे अर्ज

महापालिकेकडं ५८ हजार कोटी रुपये असतानाही मुंबईत पाणी का तुंबत?- नितीन गडकरी



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा