Advertisement

महापालिकेकडं ५८ हजार कोटी रुपये, तरी मुंबईत पाणी का तुंबतं?- नितीन गडकरी

महापालिकेकडं ५८ हजार कोटी रुपये असतानाही मुंबई कशी तुंबते असा सवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.

महापालिकेकडं ५८ हजार कोटी रुपये, तरी मुंबईत पाणी का तुंबतं?- नितीन गडकरी
SHARES

दरवर्षी मुंबईत जोरदार पाऊस पडल्यावर मुंबईची तुंबई होते. अनेक सखल भागांत पाणी साचल्यानं रस्ते वाहतूक विस्कळीत होते. तसंच, जनजीवनही विस्कळीत होतं. परंतु, महापालिकेकडं ५८ हजार कोटी रुपये असतानाही मुंबई कशी तुंबते असा सवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. बोरिवली पश्चिम येथील गोराई इथं कांदळवन उद्यानाच्या भूमीपूजनावेळी नितिन गरडकी यांनी हा सवाल उपस्थित केला. 

५८ हजार कोटी

'मी ऐकलं आहे की, महापालिकेकडं फिक्स डिपॉजीटमध्ये ५८ हजार कोटी आहेत. दरवर्षी टीव्हीवर आपण मुंबईत पाणी तुंबल्याचं पाहायला मिळतं. महापालिकेकडं असलेल्या रकमेचा वापर दुषित पाण्याच्या पुनर्वसनासाठी केला जाऊ शकतो', असं या कार्यक्रमावेळी नितीन गडकरी यांनी म्हटलं.

 

वॉटर टॅक्सी प्रकल्प

इटलीप्रमाणे मुंबईतही वॉटर टॅक्सी सेवा सुरु करण्यात आली पाहिजे असंही मत गडकरी यांनी व्यक्त केलं. मी मुंबईत कमी येतो तरी मी स्वतःला एक मुंबईकर समजतो असंही गडकरी यांनी म्हटलं आहे. विदर्भातले ५ जिल्हे लवकरच डिझेलमुक्त होतील असंही त्यांनी सांगितलं. तसंच, येत्या काळात बायो सीएनजीचा वापर वाढवणार असल्याचंही गडकरी यांनी स्पष्ट केलं.



हेही वाचा -

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लता मंगशेकर यांची घेतली सदिच्छा भेट

गणेशोत्सव २०१९: मंडपासाठी केवळ २६२० गणेशोत्सव मंडळांचे अर्ज



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा