Advertisement

Beach shacks: ८ समुद्रकिनाऱ्यांवर उभारणार बीच शॅक्स, तुम्हीही करू शकता अर्ज

राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटन वाढविण्यासाठी इको फ्रेंडली बीच शॅक्स (चौपाटी कुटी) उभारण्यासंदर्भातील धोरणास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

Beach shacks: ८ समुद्रकिनाऱ्यांवर उभारणार बीच शॅक्स, तुम्हीही करू शकता अर्ज
SHARES

राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटन वाढविण्यासाठी इको फ्रेंडली बीच शॅक्स (चौपाटी कुटी) उभारण्यासंदर्भातील धोरणास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या कुट्या तात्पुरत्या हंगामी स्वरुपाच्या (Eight beaches in Maharashtra will now have Goa like shacks to boost tourism said aaditya thackeray) असतील. प्राथमिक स्वरूपात महाराष्ट्रातील ८ समुद्रकिनाऱ्यांवर हे बीच शॅक्स उभारण्यात येतील. यामुळे पर्यटनवाढीस चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. 

‘या’ समुद्रकिनाऱ्यांवर होणार

महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहमतीने पर्यटन संचालनालयाने निश्चित केलेल्या जागेवरच तात्पुरते बीच शॅक्स उभे करण्यासाठी परवाना देण्यात येईल.  एका चौपाटीवर कमाल १० बीच शॅक्स उभारता येतील. स्थानिकांना बीच शॅक्स उभारण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. यामुळे स्थानिक रोजगारालाही चालना मिळेल.

सध्या प्रायोगिक तत्वार रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, आरेवारे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर, तारकर्ली,  रायगड जिल्ह्यातील वर्सोली, दिवेआगार आणि पालघर जिल्ह्यातील केळवा व बोर्डी या ८ किनाऱ्यांवर हे बीच शॅक्स उभारण्यात येतील. हा प्रयोग यशस्वी झाल्यास  पुढील वर्षीपासून इतर चौपाट्यांवर देखील या धोरणाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होईल. या संदर्भातील अर्ज www.maharashtratourism.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हेही वाचा - पावसाळी पर्यटनास ठाणे जिल्ह्यात बंदी, 'ही' आहेत बंदीची ठिकाणं

८० टक्के राखीव जागा

या माध्यमातून निर्माण होणाऱ्या रोजगारामध्ये स्थानिकांसाठी ८० टक्के जागा राखीव असतील. ३ वर्षांसाठी बीच शॅक्सचं वाटप करण्यात येईल. त्यांचा आकार १५ फूट लांबी आणि १५ फूट रुंद आणि १२ फूट उंच असेल. गाळ्याच्या समोर बैठक व्यवस्थेसाठी २० फूट लांब आणि १५ फूट रुंद छत टाकता येईल. 

शॅक्स मिळणाऱ्या व्यक्तीकरिता परवान्यासाठी १५ हजार रुपये अर्जाचे नापरतावा मूल्य असेल. तसंच बीच शॅक्ससाठी पहिल्या वर्षी ४५ हजार, दुसऱ्या वर्षी ५० हजार, तिसऱ्या वर्षी ५५ हजार वार्षिक शुल्क राहील.  याशिवाय ३० हजार रुपये सुरक्षा अनामत जमा करावी लागेल, जी तीन वर्षांचा कालावधी संपल्यानंतर परत केली जाईल. चौपाटी कुटी चालविण्यासंदर्भात पर्यटन विभागाने विविध नियम घालून दिले आहेत.

हे बीच शॅक्स सकाळी ७ ते सायंकाळी ७ अशा वेळेत सुरु ठेवता येतील.  तसंच संगीताचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. प्रत्येक शॅक्समध्ये सीसीटीव्ही कॅमेरा देखील असेल.

पर्यटन विभागाच्या बीच शॅक धोरणाबाबत पर्यटन संचालक दिलीप गावडे हे शनिवार २७ जून रोजी सकाळी ११ वाजता फेसबुकवरुन सविस्तर माहिती देणार आहेत. MaharashtraTourismOfficial या फेसबुक पेजवरुन या संवादाचं प्रसारण होईल.

एमटीडीसीच्या जमिनींचा विकास

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यातील शासकीय जमिनींचा आणि मालमत्तांचा पर्यटनदृष्टया विकास करण्यासाठी खाजगीकरणाच्या धोरणास तत्वत: मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

पहिल्या टप्प्यात गणपतीपुळे, माथेरान, महाबळेश्वर, हरिहरेश्वर, मिठबाव येथील महामंडळाचे रिसॉर्ट तसेच ताडोबा आणि फर्दापूर (औरंगाबाद) येथील मोकळ्या जमिनींचा विकास करण्यात येईल.  या मालमत्ता पोटभाड्याने देण्याचा कालावधी उच्चस्तरीय समिती ठरवेल.  तसंच जमिनीसाठी आकारावयाचे अधिमूल्य व वार्षिक भाडे देखील निश्चित करण्यात येईल. प्रत्येक प्रकल्पासाठी प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती करण्यात येईल.

हेही वाचा - व्हायरल होणाऱ्या फोटोंची गुगल 'अशी' करणार पडताळणी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा