Advertisement

३४.१४ लाख ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश

तौंते चक्रीवादळामुळे आलेला मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, कोल्हापूर, पुणे व राज्यातील इतर जिल्ह्यातील १०७५२ गावांतील वीज यंत्रणेचं नुकसान झालं.

३४.१४ लाख ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश
SHARES

तौंते चक्रीवादळामुळे आलेला मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, कोल्हापूर, पुणे व राज्यातील इतर जिल्ह्यातील १०७५२ गावांतील वीज यंत्रणेचं नुकसान झालं. त्यामुळे खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून मंगळवारी सायंकाळपर्यंत ६०४० गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आलं आहे.

राज्यात (maharashtra) जवळपास साडेपाच हजार विजेचे खांब पडले, तारा तुटल्या व जोरदार वारा व मुसळधार पावसाने फिडर ट्रिप झाले. अंधाऱ्या रात्री तिमिराची तमा न बाळगता व रात्रभर जागून नागरिकांना महावितरण कर्मचाऱ्यांनी सेवा दिली तसंच आताही वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी व तंत्रज्ञ प्रयत्नशील आहेत.

राज्यात  एकूण १५४६ उच्चदाब पोल वादळामुळे पडले. त्यापैकी ४२५ दुरुस्त करण्यात आले आहे. राज्यात एकूण ३९४० लघुदाब पोल वादळामुळे पडले. त्यापैकी ९७४ पूर्ववत करण्यात आले आहेत. वादळ व पावसामुळे राज्यात ९३ हजार ९३५ रोहित्रांमध्ये बिघाड झाला होता. त्यापैकी ६८ हजार ४२६ दुरुस्त करण्यात आले. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर अविरत काम करून चक्रीवादळामुळे अनेक ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत केला. नुकसानग्रस्त भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कंपनीने १३ हजार तंत्रज्ञांची मोठी फळी मैदानात उतरवली आहे.  

हेही वाचा- मुंबईच्या पालकमंत्र्यांनी केली नुकसानग्रस्त किनारपट्टीची पाहणी

४६ लाख ग्राहकांवर परिणाम

या चक्रीवादळामुळे राज्यातील जवळपास ४६ लाख ४१ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला तर ३४ लाख १४ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

चक्रीवादळाचा सगळ्यात मोठा फटका ठाणे (thane) जिल्ह्याला बसला असून यामुळे ७ लाख ८५ हजार ५१९  ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. मंगळवार संध्याकाळपर्यंत जवळपास ५ लाख ५० हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळालं आहे. या चक्रीवादळाचा दुसरा मोठा फटका रायगड जिल्ह्याला बसला असून यामुळे ७ लाख ७३ हजार ७६० ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. यापैकी जवळपास ५ लाख १० हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळालं. पालघर जिल्ह्यात ५ लाख ८८ हजार ७४३ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. यापैकी जवळपास २ लाख ४४ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळालं आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात ५ लाख ४५ हजार १२१ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता, यापैकी जवळपास ४ लाख १८ हजार ३६० ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळालं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ लाख ६६ हजार ११ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता, यापैकी जवळपास ६७ हजार १६६ ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळालं. नाशिक जिल्ह्यात ३ लाख २९ हजार ३०४ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता, यापैकी २ लाख ७२ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात २ लाख ९६ हजार ९६५ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता, यापैकी २ लाख ४९ हजार ६०१ ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यात ४ लाख ३६ हजार ७६८ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत झाला होता, यापैकी ४ लाख ८ हजार ८९ ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात १ लाख ६६ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता, तर १ लाख ४८ हजार ११२ ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यात १ लाख ५५ हजार ५४३ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता, तर १ लाख ५३ हजार ७१५ ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

विदर्भात एकूण ५३ हजार ३९२ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता, तर जवळपास ५० हजार  ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. तर मराठवाड्यात १ लाख ५ हजार १४२ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता, तर १ लाख ३ हजार ९२४ ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा