Advertisement

६ दिवसात बेस्टकडून वीज जोडणी


६ दिवसात बेस्टकडून वीज जोडणी
SHARES

तुम्ही जर तुमच्या घरासाठी वीज पुरवठा घेणार असाल तर तुम्हाला आता फार काळ वाट पाहावी लागणार नाही. कारण आता बेस्टकडून केवळ ६ दिवसात वीज जोडणी करुन दिली जाणार आहे. यासाठी बेस्टनं आपल्या कार्यपद्धतीत बदल करीत त्यामध्ये अधिक सुधारणा करण्यात केल्याचं सांगितलं अाहे.


पाच टप्प्यात वीज जोडणी

वीज जोडणीसाठी अर्ज केल्यानंतर बेस्टच्या कर्यालयातील लिपीक त्याची एका दिवसात नोंदणी करेल. त्यानंतर अर्जदाराच्या जागेची संबधीत अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात येईल. ह्या पाहणीत जर काहीही त्रुटी आढळली नाही तर २ दिवसात प्रभारी अभियंत्याकडून तो अर्ज पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात येईल. आणि त्रुटी आढळल्यास तो अर्ज रद्द करण्यात येईल. यानंतर अर्जदाराच्या मागणी पत्रावरील पुढील कार्यवाही एका दिवसात पार पाडण्यात येईल. 

भरलेल्या रकमेची प्रशासकीय अधिकारी, लिपिक किंवा पर्यवेक्षक यांच्याकडून यंत्रणेमधे नोंद केल्यानंतर एका दिवसात कनेक्शन ऑर्डर आयएफ सेक्शनला पाठविण्यात येणार अाहे. पाच दिवसात ही सर्व कामे झाल्यानंतर सहाव्या दिवशी वीज मिटर बसवून त्याची यंत्रणेत नोंद केली जाईल. 


योजनेचा लाभ घ्या

नवीन व पूर्ण विकास होणाऱ्या इमारतीसाठी वीज जोडणी करायची असल्यास त्यासाठी लागणाऱ्या कादगपत्रांची संख्यासुद्धा कमी करण्यात आली आहे. या सर्व योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन बेस्टकडून करण्यात आलं आहे.



हेही वाचा - 

पोलिस आयुक्तालयात झाड कोसळलं, दोन गाड्यांचं नुकसान

६ सप्टेंबरपर्यंत टोलचा निर्णय घ्या- उच्च न्यायालय




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा