Advertisement

दहिसरमध्ये उभारण्यात येणार एनर्जी पार्क

केवळ भारतातच नव्हे तर हा जगातील एक नाविन्यपूर्ण ऊर्जा प्रकल्प असेल.

दहिसरमध्ये उभारण्यात येणार एनर्जी पार्क
SHARES

दहिसर हा मुंबईचा शेवटचा प्रभाग आणि पालिकेच्या २२७ वॉर्डांपैकी पहिला प्रभाग असल्याचं सांगितलं जातं. याच दहिसरमध्ये लवकरच एक एनर्जी पार्क उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प केवळ पश्चिम उपनगरांनाच नाही तर सर्व मुंबईकरांना वीजनिर्मिती आणि त्याचा वापर कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती देईल. हा केवळ भारतातच नव्हे तर जगात एक नाविन्यपूर्ण ऊर्जा प्रकल्प असेल.

शिवसेना उपनेते, म्हाडाचे अध्यक्ष डॉ.विनोद घोसाळकर आणि प्रभाग क्रमांक एकच्या स्थानिक नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या संकल्पनेखाली हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी महामंडळ एक रुपयाही खर्च करणार नाही हे उल्लेखनीय आहे, असं शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि मुंबई बँकेचे संचालक अभिषेक घोषाळकर यांनी सांगितलं.

पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना मंगळवारी हा प्रकल्प सादर करण्यात आला. अभिषेक घोषाळकर, अदानीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कंद्रप पटेल, अदानीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कपिल शर्मा, महाव्यवस्थापक दीप्ती पडवळ आणि नगरपालिकेच्या फलोत्पादन विभागाचे जनार्दन माने यावेळी उपस्थित होते.

दहिसर पश्चिमेतील शहीद तुकाराम ओंबळे पार्क इथं उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित एनर्जी पार्क आणि माहिती केंद्राचं कौतुक करून मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रकल्पाला तातडीनं मंजुरी दिली. सार्वजनिक सेवेसाठी लवकरात लवकर एनर्जी पार्क आणि माहिती केंद्र उभारण्याची सूचना केली.

अदानी इलेक्ट्रिसिटीच्या सीएसआर उपक्रमाअंतर्गत पूर्ण एनर्जी पार्कला भेट देणाऱ्या नागरिकांना वीजनिर्मिती तसंच त्याच्या वापराविषयी सविस्तर माहिती दिली जाईल. अदानी इलेक्ट्रिसिटीच्या सीएसआर उपक्रमांतर्गत या प्रकल्पावर अंदाजे १५ कोटी रुपये खर्च केले जातील.

एनर्जी पार्क शालेय मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी तसंच विद्यापीठाचे विद्यार्थी यांना वीजनिर्मिती प्रसार आणि सुरक्षा उपायांची माहिती प्रदान करेल.

या ठिकाणची विशेष गोष्ट म्हणजे इथं येणाऱ्या लोकांकडून वीज निर्माण केली जाईल. तिथं बांधलेल्या मजल्यावर चालणं, सायकल चालवणं इत्यादीद्वारे वीज निर्माण केली जाईल. हे केंद्र थर्मल, इलेक्ट्रिकल, हायड्रो, बायोगॅस, न्यूक्लियर, जिओथर्मल, पवन आणि सौर ऊर्जा प्रकल्पांचे प्रदर्शनही करेल.

तसंच नगरसेविका तेजस्वी घोषाळकर यांनी सांगितलं की, नागरिकांना ऊर्जा आणि त्याचं संवर्धन आणि ऊर्जेचे विविध मंत्र याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल.



हेही वाचा

मुंबई महापालिकेत आता केंब्रिज बोर्डाच्याही शाळा : आदित्य ठाकरे

सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासाला गती

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा