Advertisement

नवी मुंबईत मॉलमध्ये शनिवारी, रविवारी अँटिजेन टेस्ट करूनच प्रवेश

नवी मुंबईतील सर्व मॉल्स आठवड्याचे सातही दिवस ५० टक्के क्षमतेने रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.

नवी मुंबईत मॉलमध्ये शनिवारी, रविवारी अँटिजेन टेस्ट करूनच प्रवेश
SHARES

कोविड (covid19)  प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवित असताना ब्रेक द चेन विषयक सुधारित शासन आदेशानुसार नवी मुंबई महापालिकेच्यावतीनेही महापालिका आयुक्त  अभिजीत बांगर यांनी ८ जून रोजी सुधारित आदेश दिलेले आहेत.

यानुसार नवी मुंबई (navi mumbai) तील सर्व मॉल्स (mall) आठवड्याचे सातही दिवस ५० टक्के क्षमतेने रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. यामध्ये मॉलमधील सर्व दुकाने एकाच दिवशी सुरू न ठेवता दररोज फक्त ५० टक्के दुकाने सुरू ठेवण्यात यावीत. म्हणजेच मॉलमधील पहिल्या दुकानापासून एक दुकान आज व त्या शेजारील दुसरे दुकान उद्या अशाप्रकारे आळीपाळीने सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. कोणत्याही सलग दोन दुकानांपैकी एक दुकान आज तर त्या शेजारील दुसरे दुकान उद्या अशा पध्दतीने दुकाने सुरू राहणार आहेत. 

 त्याचप्रमाणे प्रत्येक शनिवारी व रविवारी मॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी नागरिकांची रॅपीड अँटिजेन टेस्ट (rapid antigen test) केली जाणार आहे. त्यानंतरच त्यांना मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.  नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील चारही मोठ्या मॉलमध्ये शनिवारी आणि रविवारी ठेवलेल्या अँटिजेन टेस्टींग कॅम्प ठेवण्यात आला होता. यामध्ये २२१२ नागरिकांची अँटिजेन टेस्टींग करण्यात आली आहे. त्यामध्ये रघुलीला मॉलच्या २ प्रवेशव्दारांवर २९१, सेंटर वन मॉलच्या प्रवेशव्दारावर ४४, ग्रँड सेंट्रल मॉलच्या ४ प्रवेशव्दारांवर १०८९ तसेच इनॉर्बिट मॉलच्या ३ प्रवेशाच्या ठिकाणी ७८८ जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आलेली आहे.

ब्रेक द चेनच्या नियमात प्रतिबंधाचा स्तर ठरवून देण्यात आलेला असून नवी मुंबई महानगरपालिका दुस-या स्तरात आहे. त्यानुसार शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे दैनंदिन व्यवहारात सवलती देण्यात आलेल्या आहेत. मात्र, नागरिकांनी कोरोना अजून संपलेला नाही याचे भान राखून मास्कचा नियमित वापर, सुरक्षित अंतर आणि वारंवार हात धुणे या कोरोनापासून बचावाच्या त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करावं असं आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केलं आहे.    



हेही वाचा -

राज्यात पुन्हा लॉकडाऊन? ८ दिवसात होणार निर्णय

सर्वसामान्यांना लोकल प्रवासासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा