Advertisement

भरतीमुळे हाजीअली दर्ग्याची वेळ बदलली

भरतीमुळे हालीअली दर्गा इथं दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने दर्शनाच्या वेळेत बदल केले आहेत. ४ जून ते ७ जून दरम्यान हे बदल करण्यात आले आहेत.

भरतीमुळे हाजीअली दर्ग्याची वेळ बदलली
SHARES

मुंबईत भलेही पाऊस उशीरा पडण्याची शक्यता आहे. तरीही मुंबई महापालिकेने आतापासून सावधगिरीची पावलं उचलायला सुरूवात केली आहे. भरतीमुळे हालीअली दर्गा इथं दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने दर्शनाच्या वेळेत बदल केले आहेत. ४ जून ते ७ जून दरम्यान हे बदल करण्यात आले आहेत. भरतीमुळे दर्गा 'ज़ियारत' साठी बंद करण्यात येईल.

गेट बंद होण्याची वेळ

४ जून सकाळ ११.२० वाजता -   दुपार २.२० वाजता

५ जून दुपार १२.०० वाजता - दुपार ३ वाजता

६ जून दुपार १२.४० वाजता - दुपार ३.४० वाजता 

७ जून दुपार १.३० वाजेपासून - दुपार ४.३० वाजता


मान्सूनपूर्व पावसाची प्रतीक्षा

मुंबईत सध्या सर्वांना मान्सूनपूर्व पावसाची प्रतीक्षा लागली आहे. परंतु यंदा मुंबईकरांची उकाड्यापासून लवकर सुटका होण्याची चिन्हे नाहीत. तसं बघायला गेल्यास मे महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पाऊस किंवा वळवाच्या पावसाला सुरू होते. परंतु अद्याप पावसाची कुठलीही चिन्हे नाहीत. पुढचा आठवडाभरही पाऊस येईल याची खात्री नसून  १० जूननंतरच मुंबईत वळवाचा पाऊस पडू शकतो.हेही वाचा-

बेस्ट बसमध्येही बसवणार पॅनिक बटन

पूर्वसूचना न देता घाटकोपर-अंधेरी जोड रस्ता वाहतुकीसाठी बंद, प्रवाशांचे हालRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा