Advertisement

पूर्वसूचना न देता घाटकोपर-अंधेरी जोड रस्ता वाहतुकीसाठी बंद, प्रवाशांचे हाल

घाटकोपर-अंधेरी जोड रस्त्यावरील घाटकोपर डेपोजवळ असलेल्या लक्ष्मीबाग नाल्यावरील पूल धोकादायक ठरविण्यात आला आहे. त्यामुळं घाटकोपर-अंधेरी जोड रस्ता शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास पालिकेनं बंद केला आहे.

पूर्वसूचना न देता घाटकोपर-अंधेरी जोड रस्ता वाहतुकीसाठी बंद, प्रवाशांचे हाल
SHARES

घाटकोपर-अंधेरी जोड रस्त्यावरील घाटकोपर डेपोजवळ असलेल्या लक्ष्मीबाग नाल्यावरील पूल धोकादायक ठरविण्यात आला आहे. त्यामुळं घाटकोपर-अंधेरी जोड रस्ता शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास महापालिकेनं बंद केला आहे. मात्र, कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता हा पूल वाहतूकीसाठी बंद केल्यान या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत. वाहतूकबंदीची माहिती नसल्यामुळं शुक्रवारी या मार्गावर प्रचंड वाहतूककोंडी निर्माण झाली होती


अतिधोकादायक पूल

सीएसएमटी येथील हिमालय पूलाच्या दुर्घटनेनंतर महापालिकेनं मुंबईतील सर्व पुलांच पुन्हा सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली. या सर्वेक्षणानुसार हा पूल अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसंच, महापालिकेच्या पूल विभागानं हा पूल अतिधोकादायक असून, तो तात्काळ बंद करण्याकरीता पालिकेच्या एन विभागाला १७ मे रोजी पत्र दिलं होतं. मात्र, यावेळी कोणताही निर्णय न घेता पालिकेच्या एन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी पूल वाहतुकीसाठी बंद केला.


प्रचंड वाहतूककोंडी

घाटकोपर-अंधेरी जोड रस्ता हा पश्चिम उपनगरात जाण्याकरीता महत्वाचा मार्ग आहे. मात्र अचानक बंद केल्यानं बेस्टच्या बससह अंधेरीकडून येणाऱ्या आणि अंधेरीच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांना मोठा वळसा घालून पूर्व द्रुतगती मार्गावर यावं लागलं. त्यामुळं या परिसरातील अंतर्गत मार्गावर देखील प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होतं आहे.



हेही वाचा -

भाजपाच्या नव्या प्रदेशाध्यक्षांसाठी ‘ही’ नावे चर्चेत

महिला प्रवाशांची वाढती संख्या पाहता रेल्वे करणार पुन्हा सर्वेक्षण



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा