Advertisement

Coronavirus: संसर्गाचा धोका वाढल्यास राज्यात 'एपिडेमिक अॅक्ट'

चीनसह (China) जगभरात थैमान घातलेल्या करोना विषाणुची (Corona Virus) भारतातही अनेकांना लागण झाली आहे.

Coronavirus: संसर्गाचा धोका वाढल्यास राज्यात 'एपिडेमिक अॅक्ट'
SHARES

चीनसह (China) जगभरात थैमान घातलेल्या करोना विषाणुची (Corona Virus) भारतातही अनेकांना लागण झाली आहे. मुंबईतही काहींना कोरोनाची बाधा झाली असून, त्यामुळं सर्वसामान्यांमध्ये चिंतेचं वाचावरण निर्माण झालं आहे. अशातच कोरोना विषाणूचा संसर्ग फैलावू नये यासाठी सरकार विविध पातळ्यांवर प्रयत्नशील असताना संसर्गाचा धोका अधिक वाढल्यास राज्यात एपिडेमिक अॅक्ट (Epidemic Act) लावण्यात येणार आहे.

करोना विषाणूचा (Coronavirus) फैलाव रोखण्यासह संशयित तसेच लक्षणं असलेल्या रुग्णांना तातडीनं वैद्यकीय उपचार देण्यात येणार आहे. महाराष्ट्रामध्ये याची अंमलबजावणी गरज भासल्यास सुरू होणार आहे. परदेशातून वा संसर्गजन्य भागातून आलेल्या काही रुग्णांकडून रुग्णालयांमध्ये दाखल होण्यासंदर्भात सहकार्य मिळत नाही. घरीच थांबून १४ दिवसांनी माहिती देतो, असं सांगितलं जात असल्याची माहिती मिळते.

या अॅक्ट (Epidemic Act) अंतर्गत यंत्रणेला संबधित रुग्णाला रुग्णालयामध्ये दाखल करण्याचा हक्क असणार आहे. प्लेगच्या संसर्गाच्या वेळी हा निर्णय घेण्यात आला होता. या अॅक्टअंतर्गत रुगणहितासाठी काही महत्त्वाचं निर्णय घेण्याचा अधिकार सरकारकडं राहतो. साथीचा उद्रेक झाल्यास गरज भासल्यास हा कायदा वापरण्यात येणार आहे. मात्र त्यासंदर्भात केंद्र आणि राज्य या दोन्ही पातळ्यांवर प्राथमिक चर्चा झालेली आहे.

राज्यातील ९ जिल्ह्यांतून करोनाच्या संसर्गाची शक्यता झालेल्या संशयितांना शोधून काढणं, त्यांच्या संपर्कात असलेल्यांची माहिती घेणं, त्याची व्यवस्थित नोंद करणं यासाठी आरोग्यविभागाच्या प्रधान सचिवांसह इतर ५ विभागांचा समन्वय असणारी समिती तयार करण्यात आली आहे. त्यातून हे काम जलदगतीनं व अधिक सुनियोजितपणं करता येणार आहे.

गरज भासल्यास एपिडेमिक अॅक्टचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती मिळते. सामान्यांच्या आरोग्यहिताचे निर्णय घेण्यासाठी तसेच करोनाचा फैलाव रोखण्यासाठी हा अॅक्ट लागू केला जाऊ शकतो. चीन, इराण, इटली, द. कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या देशांतून १५ फेब्रुवारीनंतर ज्यांनी प्रवास केला आहे, त्यांना केंद्रसरकारच्या सूचनांनुसार १०० टक्के विलगीकरण करण्यात येणार आहे.

यापूर्वी आलेल्या प्रवाशांचा अशा प्रकारे पाठपुरावा त्वरित करण्यात आला नव्हता. या विषाणूची लक्षणं त्वरित दिसत नाहीत, असे लक्षात आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर लोकहितासाठी असे निर्णय घेण्यात येतील, त्यामुळं सामान्यांनी त्यामध्ये सहकार्य करण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे.



हेही वाचा -

एप्रिलपासून मुंबई विद्यापीठाची परीक्षा टॅबवर

CoronaVirus: कोरोनाचा फटका आता आंबा निर्यातीवरही



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा