Advertisement

डोंबिवलीत तीन मजली इमारत कोसळली

ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

डोंबिवलीत तीन मजली इमारत कोसळली
SHARES

ठाण्यातील डोंबिवलीत शुक्रवारी तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अग्निशमन दलाचे जवान, महापालिका प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

 केडीएमसी आयुक्त म्हणाले, “बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत एक 70 वर्षीय पुरुष आणि एक 45 वर्षीय महिला ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, "इमारत कोसळत असल्याचे लक्षात येताच आमचे सहाय्यक आयुक्त आणि इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना बाहेर काढले. मात्र तरीही दोन जण अडकल्याची माहिती समोर येत आहे. उघडकीस आले आहे."

बातम्यांनुसार, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने डोंबिवली पूर्वेतील आयरे-दत्तनगर संकुलातील मोडकळीस आलेल्या आदिनारायण नवा इमारतीतील रहिवाशांना नोटीस बजावली होती, मात्र अजूनही काही लोक संकुलात राहत होते.



हेही वाचा

मुंबईजवळ तयार होतोय नवा रेल्वेमार्ग, 5 नवीन स्थानके उभारणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा