Advertisement

फास्टॅगचे स्टिकर अपुरे, रोखीनं टोल भरण्याच्या मुदतीत १ महिन्याने वाढ

असंख्य वाहनमालकांना फास्टॅगचं स्टिकर अद्याप न मिळाल्यानं केंद्र सरकारनं रोखीनं टोल भरण्याची मुदत १ महिन्यानं वाढवली आहे. त्यामुळं वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.

फास्टॅगचे स्टिकर अपुरे, रोखीनं टोल भरण्याच्या मुदतीत १ महिन्याने वाढ
SHARES

टोल नाक्यांवर वाहतुककोडी होऊ नये यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं 'फास्टॅग'ची सुविधा वाहन चालकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. टोलनाक्यांवर टोल देण्यासाठी न थांबता ही रक्कम इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं खात्यातून वजा करण्याची सुविधा देणारी फास्टॅग प्रणाली ही शनिवारी मध्यरात्रीपासून देशभरात लागू झाली. परंतु, असंख्य वाहनमालकांना फास्टॅगचं स्टिकर अद्याप न मिळाल्यानं केंद्र सरकारनं रोखीनं टोल भरण्याची मुदत १ महिन्यानं वाढवली आहे. त्यामुळं वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.

दुप्पट टोल

देशातील राष्ट्रीय महामार्गांवर असणाऱ्या टोलनाक्यांवर फास्टॅगच्या माध्यमातून टोल भरणं आता अनिवार्य करण्यात आलं आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं याआधी दिलेल्या निर्देशांनुसार फास्टॅग लागू झाल्यानंतर सर्व टोलनाक्यांवर रोखीनं टोल रक्कम भरण्यासाठी केवळ एकच मार्गिका सुरू ठेवण्यात येणार होती. या मार्गिकेतून जाणाऱ्या चालकांना फास्टॅग न लावल्याबद्दल दुप्पट टोल द्यावा लागणार होता.


२५ टक्के मार्गिका

मात्र, प्राधिकरणानं दिलेल्या सुधारित निर्देशांनुसार देशभरातील टोलनाक्यांवर २५ टक्के मार्गिका रोखीनं टोल भरण्यासाठी राखीव असणार असून, ही सुविधा १ महिना म्हणजे १५ जानेवारीपर्यंत दिली जाणार आहे. रोखीनं टोल भरण्यासाठीच्या मार्गिकेव्यतिरिक्त मार्गिकेत एखादं वाहन घुसले व त्याच्याकडं फास्टॅग नसेल तर त्याच्याकडून दुप्पट दंड आकारला जाणार आहे.

९६ लाख स्टिकर्स

फास्टॅग सुविधेला वाहनमालकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचं समजतं. आतापर्यंत ९६ लाख फास्टॅग स्टिकरची विक्री झाल्याची माहिती सरकारतर्फे देण्यात आली आहे. असंख्य वाहनमालकांनी वाढीव मुदतीत अर्ज केल्यानं त्यांना स्टिकर देण्यास आणखी काही दिवस लागणार आहेत. त्यामुळं रोख रकमेच्या मार्गिकांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे.



हेही वाचा -

मुंबई विमानतळ ते पुणे, दापोलीसाठी एसटीची बससेवा सुरु

२ तासांत सलमानचं घर बाॅम्बने उडवेल, पोलिसांना धमकीचा ई-मेल आला आणि...



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा