तुम्ही बनावट कॅडबरी तर खात नाही ना? काळजी घ्या...

जप्त करण्यात आलेल्या चॉकलेट्सच्या पाकिटावर आवश्यक ती माहिती नसल्याने तसंच पाकिटावर शाकाहारी असल्याचा 'हिरवा लोगो' नसल्याने ही चाॅकलेट्स बनावट असल्याचा आम्हाला संशय आहे. सोबतच चाॅकलेट विक्रेता 'एफडीए'चा परवाना न घेताच 'कॅडबरी' चाॅकलेट विकत असल्याचही समोर आलं आहे. त्यानुसार तपास सुरू असल्याचं शैलेश आढाव सह आयुक्त, बृहन्मुंबई(अन्न) एफडीए यांनी 'मुंबई लाइव्ह' शी बोलताना सांगितलं.

SHARE

लहान मुलांचं सर्वात फेव्हरेट खाणं म्हणजे चॉकलेट, त्यातही 'कॅडबरी' कंपनीचं 'डेअरी मिल्क' त्यांचा जीव की प्राण. मार्केटमधील दर्जा आणि पत कायम राखल्याने 'कॅडबरी'ने थोरामोठ्यांना आपलंस केलं आहे. त्यामुळे मागणी होताच वडिलधारे मंडळीही 'कॅडबरी'चा बालहट्ट सहज पुरवतात. परंतु यापुढे आपल्या लहानग्याला हे चाॅकलेट देताना जरा सावध रहा... कारण अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए) ने मस्जिद बंदर इथून तब्बल १७ लाख ३५ हजार ५६० रूपयांचं 'डेअरी मिल्क' चाॅकलेट बनावट असल्याच्या संशयावरून जप्त केलं आहे.


संशय कशावरून?

जप्त करण्यात आलेल्या चॉकलेट्सच्या पाकिटावर आवश्यक ती माहिती नसल्याने तसंच पाकिटावर शाकाहारी असल्याचा 'हिरवा लोगो' नसल्याने ही चाॅकलेट्स बनावट असल्याचा आम्हाला संशय आहे. सोबतच चाॅकलेट विक्रेता 'एफडीए'चा परवाना न घेताच 'कॅडबरी' चाॅकलेट विकत असल्याचही समोर आलं आहे. त्यानुसार तपास सुरू असल्याचं शैलेश आढाव सह आयुक्त, बृहन्मुंबई(अन्न) एफडीए यांनी 'मुंबई लाइव्ह' शी बोलताना सांगितलं.


कधी टाकला छापा?

'एफडीए'ला मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार १० सप्टेंबरला अन्न सुरक्षा अधिकारी सी. स्वामी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मस्जिद बंदरच्या बेंसॉन हाऊस येथील ए. एच. इंटरप्रायझेस दुकानावर छापा टाकला. या छाप्यात चॉकलेट बाबत संशय आल्यानं 'एफडीए'च्या पथकाने कॅडबरी डेअरी मिल्क चॉकलेटची तपासणी केली. त्यात अन्न सुरक्षा कायद्या नुसार चॉकलेटच्या पाकिटावर आवश्यक माहिती छापली नसल्याचं निदर्शनास आलं. तर विना परवाना चॉकलेटची विक्री होत असल्याचंही समोर आलं.


किती चाॅकलेट्स जप्त?

त्यानुसार १६५ ग्रॅमचे १९२८४ कॅडबरी डेअरी मिल्कच्या पाकिटाचा साठा 'एफडीए'ने जप्त केला आहे. या साठ्याची किंमत १७ लाख ३५ हजार ५६० रुपये इतकी आहे. या चाॅकलेट्सचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तर संबंधित विक्रेत्यासह जिथून त्याने हे चॉकलेट्स विकत घेतले त्यांच्या विरोधातही आता अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आल्याची माहिती आढाव यांनी दिली आहे.

ही चॉकलेट बनावट वा अप्रामाणित होती किंवा नाही हे नुमन्याचा अहवाल आल्यानंतरच समजेल. त्यामुळे केवळ चॉकलेट नव्हे, तर कुठलेही खाद्यपदार्थ खरेदी करताना काळजी घ्यावी, बिल मागावं, असं आवाहनही आढाव यांनी केलं आहे.हेही वाचा-

३४३ औषधांवर केंद्राची बंदी; सिप्ला, वोखार्डसह बड्या कंपन्यांना झटका

देशभरातल्या औषध विक्रेत्यांचा २८ सप्टेंबरला बंदसंबंधित विषय
ताज्या बातम्या