Advertisement

वांद्र्यातील ताज लॅन्ड एन्ड हाॅटेलात आढळले झुरळ, एफडीएने केली 'ही' कारवाई

वांद्र्यातील प्रसिद्ध ताज लॅन्ड एन्ड या पंचतारांकित हॉटेलात झुरळांचा प्रादुर्भाव आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने हाॅटेलवर कारवाई केली आहे.

वांद्र्यातील ताज लॅन्ड एन्ड हाॅटेलात आढळले झुरळ, एफडीएने केली 'ही' कारवाई
SHARES

वांद्र्यातील प्रसिद्ध ताज लॅन्ड एन्ड या पंचतारांकित हॉटेलात झुरळांचा प्रादुर्भाव आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने हाॅटेलवर कारवाई केली आहे. स्टोरेज कक्षातील मुदतबाह्य अन्नसाठा नष्ट करुन झुरळांचा प्रादुर्भाव दूर होईपर्यंत स्टोरेज कक्ष बंद करण्याचे निर्देश एफडीएने हाॅटेल प्रशासनाला दिले आहेत.

राज्यातील जनतेच्या आरोग्याची हिताची जबाबदारी लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाचा कारवाईचा एक भाग म्हणून मुंबईतील नामांकित पंचतारांकित हॉटेल मे. इंडियन हॉटेल्स कंपनी ली. ताज लॅन्ड एन्ड, वांद्रे (प) या हॉटेलमध्ये ३ मार्च २०२१ रोजी प्रशासनामार्फत तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये आस्थापनेतील अन्न पदार्थ साठविण्याच्या काही फ्रीजवरील तपमान निदर्शक यंत्रणा आढळून आली नाही. तसंच इथं गोडा, चिज, वॉटरमिलन ज्यूस, इडलीचे पीठ, फळाचे रस, ग्रिन ॲपेल इत्यादी अन्न पदार्थाचा मुदतबाह्य साठा अन्न पदार्थ तयार करण्यासाठी साठविल्याचं आढळून आलं.

हेही वाचा- "मला कोरोना झालाय", प्रवाशाच्या खुलाश्यानंतर विमानात गोंधळ

तसंच मुख्य किचन मधील अन्न पदार्थ स्टोरेज कक्षात झुरळांचा प्रादुर्भाव आढळून आल्याने हे स्टोरेज कक्ष झुरळांचा प्रादुर्भाव दूर होईपर्यंत बंद करण्याचे तात्काळ निर्देश देण्यात आले. त्याचप्रमाणे मुदतबाह्य अन्न पदार्थाचा साठा तात्काळ जनआरोग्याच्या हितार्थ नष्ट करण्यात आला व पुढील कारवाई अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत करण्यात येत आहे.

सदरची कारवाई पंचतारांकित तसंच तत्सम हॉटेलांच्या तपासणीसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष पथकाचे अन्न सुरक्षा अधिकारी जी.एम. कदम, अन्न सुरक्षा अधिकारी यो.सु.कणसे व एम.एन.चौधरी, सहायक आयुक्त (अन्न) बृहन्मुंबई यांनी शशिकांत केकरे सहआयुक्त (अन्न) बृहन्मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

(fda take action after cockroach found at taj lands end hotel at bandra)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा