Advertisement

पालिकेतील कामगार भरतीचा मार्ग खुला; १५ सप्टेंबरपर्यंत अंतिम निकाल


पालिकेतील कामगार भरतीचा मार्ग खुला; १५ सप्टेंबरपर्यंत अंतिम निकाल
SHARES

मागील अनेक महिन्यांपासून रखडलेल्या मुंबई महापालिकेच्या चतुर्थ श्रेणीतील १३८८ कामगारांच्या पदासाठी घेतलेल्या परीक्षेचा मार्ग मोकळा झाला. राज्य सरकारने या परीक्षेच्या निकालाला हिरवा कंदील दाखवला अाहे.  त्यानंतर महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी भरती प्रक्रिया सुरु करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाला दिल्या अाहेत. त्याप्रमाणे प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. येत्या१५ सप्टेंबरपर्यंत परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

१५०० उमेदवारांना ९० टक्के गुण

मुंबई महापालिकेतील कामगार, कक्ष परिचर, श्रमिक, हमाल आया व स्मशान कामगार आदी पदांसाठी १३८८ कामगारांची भरती सरळ सेवेद्वारे भरण्याचा निर्णय घेऊन ऑनलाईनद्वारे अर्ज मागवण्यात आले होते. यासाठी एकूण २ लाख ८७ हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. परंतु यापैकी परिक्षेला २ लाख ४२ हजार उमेदवार बसले होते. पण उमेदवारांमधून १ लाख ६ हजार १९३ उमेदवार उत्तीर्ण झाले होते. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी ५० गुणांची आवश्यकता होती. त्यामुळे ५० गुण आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळवून हे सर्व उमेदवार उत्तीर्ण झाले. यामध्ये तब्बल १५०० उमेदवार हे ९० टक्क्यांपर्यंत गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.


परीक्षेचा मुद्दा विधानपरिषदेत 

उमेदवारांच्या भरतीची प्रक्रिया सुरु असतानाच भाजपाचे आमदार भाई गिरकर यांनी विधानपरिषदेत आवाज उठवून या परीक्षेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांची जंत्रीच वाचवून दाखवली. जे प्रश्न परीक्षेत विचारण्यात आले होते, त्या प्रश्नांची उत्तरं बारावी शिकलेली मुले देऊ शकत  नाहीत. त्यामुळे ही भरतीच रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यामुळे या भरती प्रक्रियेला स्थगिती दिली होती. याबाबत राज्य सरकारने दहा दिवसांपूर्वी महापालिकेला पत्र पाठवून ही प्रक्रिया सुरु करण्याची सूचना केली. त्यानंतर महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सामान्य प्रशासन विभागाला याबाबतचे निर्देश दिले आहेत.


निकालास ३ महिने विलंब  

सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सुधीर नाईक यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सरकारकडून सकारात्मक उत्तर आल्यानंतर महापालिका आयुक्तांनी ही प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार भरती प्रक्रिया राबवणाऱ्या महाऑनलाईन संस्थेला काम पुढे सुरु करण्याचे निर्देश दिले असल्याचं त्यांनी सांगितलं. उत्तीर्ण उमेदवारांची आरक्षणनिहाय यादी बनवून अंतिम निकाल हा १५ सप्टेंबरपर्यंत जाहीर केला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. यापूर्वी हा निकाल एप्रिलपर्यंत जाहीर केला जाणार होता. परंतु स्थगितीमुळे हा निकाल लागण्यास तीन महिने विलंब झाला आहे.हेही वाचा - 

अकरावीची शेवटची गुणवत्ता यादी ७ ऑगस्टला

राणीबागेतील पिंजऱ्याच्या बांधकामासाठी वादग्रस्त ‘हायवे’ कंपनीचं सिलेक्शन
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा