Advertisement

कचरा वर्गीकरण न केल्यास ५ हजारांचा दंड, पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल महापालिकेने शहरात वर्षभरापूर्वी कचरा वर्गीकरणी सक्ती केली होती. मात्र, याची अंमलबजावणी होत नसल्याचं आढळून आलं. त्यामुळे आता पालिकेने कठोर पावलं उचलली आहेत.

कचरा वर्गीकरण न केल्यास ५ हजारांचा दंड, पनवेल महापालिकेची कारवाई
SHARES

कचरा वर्गीकरण न केल्यास ५ हजारांचा दंड आकारण्याची घोषणा पनवेल महापालिका प्रशासनाने केली आहे. पालिकेने शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांना याबाबत नोटीस दिसून असून आठ दिवसांची मुदत दिली आहे.

पनवेल महापालिकेने शहरात वर्षभरापूर्वी कचरा वर्गीकरणी सक्ती केली होती. मात्र, याची अंमलबजावणी होत नसल्याचं आढळून आलं. त्यामुळे आता पालिकेने कठोर पावलं उचलली आहेत.  कचरा वर्गीकण न केल्यास पाच हजारांचा दंड आकारणार असल्याचं पालिका प्रशासनानं जाहीर केलं आहे. 

पनवेल पालिका क्षेत्रात रोज अडीच मेट्रिक टन कचरा जमा होतो.  सध्या घोट गावाशेजारील सिडकोच्या नागरी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पात कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते. ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती केली जात आहे. मात्र भविष्यात कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा अपुरी पडणार आहे. परिणामी कचरा समस्या गंभीर होणार आहे. यामुळे पालिका प्रशासनाने कचरा वर्गीकरणासाठी नागरिकांना आवाहन केलं आहे.

पालिकेने कचरा वर्गीकरणाची अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्येक प्रभागासाठी एक स्वच्छता निरीक्षक नेमले आहेत. यानंतरही ही समस्या अद्याप सुटलेली नाही. त्यामुळे आता पालिका प्रशासन दंडात्मक कारवाई करणार आहे. कचरा वर्गीकरण न केल्यास रहिवाशांना पाच हजारांचा दंड आकारला जाणार आहे.  कारवाई करण्यापूर्वी पालिकेचे स्वच्छता निरीक्षक प्रत्येक सोसायटीमध्ये जाणार आहेत. यावेळी तेथील रहिवाशांना ते कचरा प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करणार आहेत. 



हेही वाचा -

संजय गांधी नॅशनल पार्क पर्यटकांसाठी पुन्हा खुले, पण 'या' आहेत अटी

मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली, शहरातील सर्वाधिक खराब एक्यूआयची नोंद



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा