Advertisement

ठाण्यातील रेमंड्स कंपनीच्या कार्यालयाला आग

वर्तक नगरमध्ये परिसरात रेमंड्स कंपनीचं एक मजली कार्यालय आहे. पहाटे साडेपाच वाजताच्या या कार्यालयाला आग लागली.

ठाण्यातील रेमंड्स कंपनीच्या कार्यालयाला आग
SHARES

ठाण्यातील वर्तक नगरमधील रेमंड्स कंपनीच्या कार्यालयाला बुधवारी पहाटे भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४-५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी काही तासांतच आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कंपनीची मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.

वर्तक नगरमध्ये परिसरात रेमंड्स कंपनीचं एक मजली कार्यालय आहे. पहाटे साडेपाच वाजताच्या या कार्यालयाला आग लागली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दलाच्या ४  गाड्या, ५ पाण्याचे टँकर आणि पोलीस दाखल झाले होते.

काही तासांतच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. आगीत कार्यालयातील लाखो रुपयांचं सर्व सामान जळून खाक झालं आहे. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.


हेही वाचा -

मुंबईतील 'इतक्या' इमारती टाळेबंदीतून मुक्त 

दिलासा! मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मिळणार वाढीव गुण



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा