Advertisement

अग्निशमन अधिकाऱ्याला ३०४ चे कलम, जवानांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा


अग्निशमन अधिकाऱ्याला ३०४ चे कलम, जवानांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा
SHARES

कमला मिल आग दुर्घटनेप्रकरणी अग्निशमन अधिकारी राजेंद्र पाटील यांना अटक करण्यात आल्याने अग्निशमन जवानांनी निषेध म्हणून सामूहिक राजीनामे देण्याचा निर्धार केला. या प्रकरणात अग्निशमन जवान व अधिकाऱ्यांचा नाहक बळी दिला जात असून, पुन्हा असे प्रकार घडल्यास एनअोसी देण्याचे कामच अाम्ही करणार नाही, असा इशाला जवानांनी दिला अाहे.


राजेंद्र पाटील यांना अटक

कमला मिलमधील वन अबोव्ह अाणि मोजोस बिस्त्रो या पबला लागलेल्या अागीच्या दुर्घटनेनंतर जागेचे चुकीचे छायाचित्र सादर करून तपास यंत्रणेची दिशाभूल केल्याचा अारोप ठेवत अग्निशमन अधिकारी राजेंद्र पाटील यांना पोलिसांनी अटक केली अाहे. त्याचा निषेध म्हणून अग्निशमन जवानांनी राजीनामे देण्याचा इशारा दिला अाहे. याविषयी भायखळा येथील मुख्य कार्यालयात सर्व अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी सर्वांचे म्हणणे एेकून घेतल्याची माहिती समजते. पाटील यांना कलम ३०४ अन्वये अटक केल्याची तीव्र नाराजी अधिकाऱ्यांनी बोलून दाखवली.


३०४ कलम लावणे अयोग्य

कोणत्याही बांधकामाला अग्निसुरक्षेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या एनओसीसाठी अग्निशमन अधिकाऱ्याला जबाबदार धरले जात असेल तर एकाच बांधकामाला अनेक जण एनओसी देतात. मग उद्या सर्वांनाच दोषी ठरवून अशाप्रकारची कलमं लावली जातील. त्यामुळे निष्काळजीपणाबद्दल अधिकाऱ्यांना शिक्षा व्हावी, परंतु त्यासाठी कलम ३०४ लावणे योग्य नसल्याचे सर्व अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.


मालकांचीही अाहे जबाबदारी

कोणत्याही बांधकामांमध्ये अग्निसुरक्षा राखणे, ही संबंधित मालकाची जबाबदारी असते. तसेच आगीसारखी दुघर्टना घडल्यास पर्यायी मार्ग ठेवणे, हीसुद्धा त्यांचीच जबाबदारी आहे. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये मालकांचा संबंध येत असताना तिथे अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून जर अटक होणार असेल तर आम्हाला यापुढे एनओसी देण्याचे कामच करायचे नसल्याचे अधिकाऱ्यांनी या बैठकीत सांगितल्याचे समजते. दरम्यान, रहांगदळे यांनी आपल्याकडे कोणीही राजीनामा दिला नसल्याचे स्पष्ट केले.


हेही वाचा -

कमला मिल आग: अग्निशमन अधिकाऱ्यासह दोघांना अटक

अग्निशमन दलाच्या जवानांना मिळणार नवा गणवेश


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा