Advertisement

मुंबईतील २९ मॉलना अग्निशमन दलाची नोटीस

नागपाडा येथील सिटी सेंटर माॅलमध्ये लागलेल्या आगीनंतर मुंबईतील ७५ माॅलची तपासणी करून आग प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती घेण्यात आली.

मुंबईतील २९ मॉलना अग्निशमन दलाची नोटीस
SHARES

अग्निप्रतिबंधक यंत्रणेत त्रुटी असलेल्या मुंबईमधील २९ मॉलला अग्निशमन दलाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नागपाडा येथील सिटी सेंटर माॅलमध्ये लागलेल्या आगीनंतर मुंबईतील ७५ माॅलची तपासणी करून आग प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती घेण्यात आली. यापैकी २९ मॉलमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना कागदावर असल्याचं आढळून आलं. 

नियम धाब्यावर बसवणाऱ्या या माॅल मालकांनी त्रुटी दूर न केल्यास परवाना रद्द करण्यासह कायदेशीर कारवाई करण्यात असल्याचा इशारा मुंबई अग्निशमन दलानं  दिला आहे.  त्याचबरोबर मॉलमधील अनधिकृत बांधकामप्रकरणी संबंधित विभाग कार्यालयांमधील साहाय्यक आयुक्तांमार्फत कारवाई करण्यात येणार आहे. 

नागपाडा येथील सिटी सेंटर मॉलमध्ये लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला तब्बल ५६ तास लागले होते. या भीषण घटनेनंतर मुंबईतील मॉल्समधील अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे अग्निशमन दलाने मुंबईतील सर्वच मॉलची पाहणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 

गेल्या १० दिवसांत ७१ माॅल्सची पहाणी करण्यात आली. यामध्ये अग्निप्रतिबंध यंत्रणेत त्रुटी असल्याचे आढळल्यामुळे २९ मॉल्सना अग्निशमन दलाने नोटीस बजावली आहे. यात शहरातील तीन, पूर्व उपनगरांतील चार तर पश्चिम उपनगरांतील २२ मॉल्सचा समावेश आहे.  कांदिवलीतील पाच, तर बोरिवलीतील चार, मालाड आणि सांताक्रुझमधील प्रत्येकी तीन, तर दहिसरमधील दोन मॉल्सचा त्यात समावेश आहे. दरम्यान, काही मॉल्समध्ये अनधिकृत बांधकाम, तसेच नियमांचे उल्लंघन केल्याची बाब निदर्शनास आली आहे.

नोटीस मिळालेले मॉल 

१) सीआर २ मॉल, नरिमन पॉईंट

२) सिटी सेंटर मॉल नागपाडा

३) नक्षत्र मॉल दादर

४) डी. बी. मॉल जुहू

५) रिलायन्स रिटेल लि. सांताक्रुझ

६) मिलन मॉल सांताक्रुझ (प.)

७) केनी वर्थ शॉपिंग सेंटर खार

८) ग्लोबल प्रा. लि. वांद्रे

९) सुब्रिया मॉल वांद्रे

१०) टिंथ सेंटर मॉल कांदिवली

११) गोकुळ शॉपिंग सेंटर बोरिवली

१२) देवराज मॉल बिल्डिंग दहिसर

१३) रिलायन्स मॉल बोरिवली

१४) सेंटर प्लाझा मॉल मालाड

१५) के. स्टार मॉल चेंबूर

१६) ठाकूर मूव्ही अँड शॉपिंग सेंटर कांदिवली

१७) अॅनेक्स मॉल कम थिएटर कांदिवली

१८) क्युबिक मॉल चेंबूर

१९) द मॉल मालाड

२०) हायको मॉल बिल्डिंग पवई

२१) ड्रीम मॉल भांडुप

२२) विष्णू शिवम मॉल कांदिवली

२३) साई कृपा मॉल दहिसर

२४) इस्टन प्लाझा मॉल मालाड

२५) हाय लाईफ प्रिमाईसीस सांताक्रुझ,

२६) द झोन मॉल बोरिवली,

२७) गारुर अँड वेल इंडिया लिमिटेड कांदिवली

२८) गोकुळ शॉपिंग आर्किडीया बोरिवली

२९) रिलायन्स मॉल वांद्रे



हेही वाचा  -

सर्वसामान्यांसाठी ५०० ते ६०० रुपयात उपलब्ध होणार कोरोनाची लस

टोलच्या दरात सरासरी १० टक्के वाढ



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा