Advertisement

वांद्र्यातील नर्गिस दत्तनगर झोपडपट्टीत भीषण आग

मंगळवारी सकाळच्या सुमारास वांद्र्यातील नर्गिस दत्तनगर येथील झोपडपट्ट्यांना पुन्हा एकदा भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे आसपासच्या परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले.

वांद्र्यातील नर्गिस दत्तनगर झोपडपट्टीत भीषण आग
SHARES

मुंबईतल्या वांद्र्यातील नर्गिस दत्तनगर येथील झोपडपट्ट्यांना पुन्हा एकदा भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मंगळवारी सकाळी 11.50 वाजेच्या सुमारास ही आग लागली. मात्र आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेलं नाही. या आगीमुळे आसपासच्या परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले असून 50 हून अधिक झोपड्या या परिसरात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 





आगीचं कारण?

वांद्र्यातील नर्गिस दत्तनगर परिसरात लागलेली आह ही लेव्हल तीनची असून 8पाण्याचे ट्रँकर आणि अग्नीशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

प्रथमिक माहितीनुसार सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग भडकली. या आगीत जवळपास 100 झोपड्या जळून खाक झाल्याचं समजतं. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहे. या झोपडपट्टीच्या जवळपासच्या परिसरात फर्निचरची दुकानं आहेत. त्यामुळे आग पसरण्याची भीती वर्तवली जात आहे. दरम्यान या आगीत काही लोक जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


हेही वाचा - 

वांद्रे-गरीबनगरला आग लावणारे बाप-बेटे अटकेत

वांद्र्याच्या गरीब नगरवरील कारवाईला हायकोर्टाची स्थगिती

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा