Advertisement

वांद्र्याच्या गरीब नगरवरील कारवाईला हायकोर्टाची स्थगिती


वांद्र्याच्या गरीब नगरवरील कारवाईला हायकोर्टाची स्थगिती
SHARES

मुंबई महापालिकेकडून सुरू असलेल्या वांद्रे पूर्वेकडील अनधिकृत गरीब नगर झोपडपट्टीवरील कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. गरीब नगरच्या रहिवाशांसाठी हा मोठा दिलासा आहे.


कुणी केली याचिका?

गरीब नगरच्या रहिवासी निलोफर कुरेशी यांनी महापालिकेच्या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करूत दाद मागितली आहे. या याचिकेवर सुनावाणी करताना उच्च न्यायालयाने स्थगितीचे आदेश देताना पुढील आठवडाभर स्थिति 'जैसे थे' ठेवण्यास मुंबई महापालिकेला सांगितले आहे.


महापालिकेकडून झोपड्यांना लक्ष्य 

एल्फिस्टन्स दुर्घटनेनंतर मुंबई महापालिका आणि रेल्वे प्राधिकरणाने रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांवर कारवाई करण्यास सुरू केली आहे. त्यानुसार वांद्रे रेल्वे स्थानकाला खेटून असलेल्या गरीब नगरमधील अनधिकृत झोपड्यांना महापालिकेने लक्ष्य केले आहे.

गेल्या आठवड्यात महापालिकेची कारवाई सुरू असतानाच सिलिंडर स्फोटाने झोपडपट्टीला आग लागून त्यात अनेक झोपड्यांसह वांद्रे पूर्वेकडील तिकीटघरही जळून भस्मसात झाले. शिवाय या दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानासह एक रहिवासीही जखमी झाला.

दरम्यान ही आग जाणीवपूर्वक लावल्याप्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी एका आरोपीला अटक देखील केली आहे.



हेही वाचा-

कच्ची बांधकामं पक्की करण्यासाठी आग लागली - राज

७ वर्षांत तिसऱ्यांदा आग, गरीब नगरचं जुनंच अस्त्र?

धक्कादायक! वांद्र्यातील 'ती' आग लागली नाही, तर लावली!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा