वांद्रे-गरीबनगरला आग लावणारे बाप-बेटे अटकेत

मुख्य आरोपी सलीम सय्यद ऊर्फ सलीम लाइटवाला आणि त्याचा मुलगा सलमान सय्यद याला पोलिसांनी नालासोपाऱ्यातून शोधून काढले. सलीम हा आझाद मैदान दंगलीतील आरोपींपैकी एक असून वाकोला येथे त्याला नकली नोटांसह अटक करण्यात आली होती.

वांद्रे-गरीबनगरला आग लावणारे बाप-बेटे अटकेत
SHARES

वांद्रे येथील पालिकेची अतिक्रमणविरोधी कारवाई रोखण्यासाठी शेकडो झोपड्यांना आग लावणाऱ्या फरार बाप-बेट्यांना पकडण्यात निर्मलनगर पोलिसांना यश आले आहे. मुख्य आरोपी सलीम सय्यद ऊर्फ सलीम लाइटवाला आणि त्याचा मुलगा सलमान सय्यद याला पोलिसांनी नालासोपाऱ्यातून शोधून काढले. सलीम हा आझाद मैदान दंगलीतील आरोपींपैकी एक असून वाकोला येथे त्याला नकली नोटांसह अटक करण्यात आली होती.


शेकडो झोपड्या जळून खाक

वांद्रे स्थानकाच्या बाहेर असलेल्या गरीबनगर झोपडपट्टीवर पालिकेचे कर्मचारी ऑक्टोबरमध्ये कारवाईसाठी गेले होते. या बेकायदा झोपड्यांवर कारवाई सुरू असताना अचानक रुळालगत असलेल्या झोपड्यांना आग लागली. ही आग इतकी भीषण होती, की शेकडो झोपड्या या आगीत जळून खाक झाल्या. परिणामी पालिकेला ही कारवाई अर्ध्यावरच सोडावी लागली. मात्र, पोलिस चौकशीत ही आग लागली नसून लावण्यात आल्याचे पुढे आले. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून शबीर खान नावाच्या व्यक्तीला संशयित म्हणून ताब्यात घेतले.


दुकानावरची कारवाई रोखण्यासाठी पेटवल्या झोपड्या!

शबीर खानची अधिक चौकशी केली असता त्याने मुख्य आरोपी सलीम सय्यद ऊर्फ सलीम लाइटवाला आणि त्याचा मुलगा सलमान सय्यद यांनी त्यांच्या दुकानावर होणारी कारवाई रोखण्यासाठी सिलेंडर स्फोट घडवत आग लावल्याची कबुली दिली. त्या दिवसापासून निर्मलनगर पोलिस या दोघांचा शोध घेत होते. हे दोघेही सध्या नालासोपाराच्या डांगे कॉम्प्लेक्स येथे लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्यांना अटक केली.



हेही वाचा

७ वर्षांत तिसऱ्यांदा आग, गरीब नगरचं जुनंच अस्त्र?


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा