कबुतरखान्याजवळ इमारतीला लागलेली आग विझली

    मुंबई  -  

    दादरमधील भवानीशंकर रोड कबुतरखान्याजवळ श्रीप्रसन्ना इमारतीला लागलेली आग विझली आहे. ही घटना शनिवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारात घडली होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार प्रसन्ना इमारतीतील फ्लॅट क्रमांक 405 मध्ये रेफ्रिजरेटरचा स्फोट झाल्याने आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि दोन रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगिवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यामध्ये जोशी आणि त्यांच्या शेजाऱ्यांच्या घराचे नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच चौथा मजला रिकामा करण्यात आला. पुढील तीन ते चार दिवस या ठिकाणी विजपुरवठा खंडित करण्यत आला आहे. सध्या पोलीस तपास सुरू आहे.  

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.