Advertisement

वाळकेश्वरच्या लिजंड टॉवरला आग, कुणीही जखमी नाही


वाळकेश्वरच्या लिजंड टॉवरला आग, कुणीही जखमी नाही
SHARES

वाळकेश्वर येथील ३१ मजल्यांच्या लिजंड टाॅवरला लागलेली आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. रहिवासी इमारतीत लागलेल्या या आगीत सुदैवाने कुणीही जखमी झालेलं नसलं, तरी डुप्लेक्स फ्लॅटचं मात्र चांगलंच नुकसान झालं आहे.

या इमारतीतील १७ आणि १८ व्या मजल्यावरील ड्युप्लेक्स घराला लागलेल्या आगीत घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि सजावटीचं सामान जळून खाक झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.



कधी लागली आग?

सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास वाळकेश्वर येथील बाणगंगा परिसरात असलेल्या लिजंड टॉवरला अचानक आग लागली. त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाला बोलावण्यात आलं. बहुतांश इमारत रिकामी असली, तरी काही फ्लॅटमध्ये असलेल्या रहिवाशांना बाहेर काढून अग्निशमन दलाच्या जवानांनी संपूर्ण इमारत खाली केली.

अग्निशमन दलाने एकूण ३ फायर इंजिन ३ जेट टँकर्सच्या मदतीने आग आटोक्यात आणली. आग विझवण्यात इमारतीच्या फायर फायटींग उपकरणाची देखील मदत झाल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. आग नेमकी कशाने लागली? ते मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या इमारतीत अनेक बड्या उद्योगपतींची घरं असल्याचं समजतं आहे.



हेही वाचा-

साकीनाका आग दुर्घटना: सहायक आयुक्तांसह परवाना आणि आरोग्य अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

अनधिकृत सिलिंडरविरोधात कारवाई पुन्हा सुरु


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा