Advertisement

माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचं कोरोनाने निधन

महाराष्ट्राच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचं गुुरुवारी कोरोनामुळे निधन झालं. त्या ७१ वर्षांच्या होत्या.

माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचं कोरोनाने निधन
SHARES

महाराष्ट्राच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचं गुुरुवारी कोरोनामुळे निधन झालं. त्या ७१ वर्षांच्या होत्या. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान प्रकृती बिघडल्याने पहाटे चार वाजता त्यांचं निधन झालं.

महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त म्हणून नीला सत्यनारायण यांची ओळख होती. त्या१९७२ च्या बॅचच्या सनदी अधिकारी होत्या. प्रशासकीय अधिकारी म्हणून ३७ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. गृहखाते, वनविभाग, माहिती व जनसंपर्क, समाजकल्याण, ग्रामविकास अशा विविध खात्यांमध्ये त्यांनी काम केलं होतं. त्या लेखिका आणि कवयित्रीही होत्या. 

नीला सत्यनारायण यांनी हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषांमधून १३ पुस्तके लिहिली आहेत. याशिवाय १५० हून अधिक कविता लिहिल्या. त्यांच्या काही पुस्तकांवर चित्रपटदेखील तयार करण्यात आले. याशिवाय त्यांनी काही मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केलं होतं. त्यांचे मराठीतील ‘एक पूर्ण अपूर्ण’ हे आत्मचरित्रपर पुस्तक खूपच लोकप्रिय ठरले होते. सत्यनारायण यांच्या कथेवरून 'बाबांची शाळा' हा मराठी चित्रपट निघाला. या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शनही त्यांनीच केलं होतं.

नीला सत्यनारायण यांची पुस्तके

आई-बाबांची शाळा (मार्गदर्शनपर)
आयुष्य जगताना
एक दिवस (जी)वनातला (अनुभवकथन)
एक पूर्ण - अपूर्ण (आत्मचरित्रपर)
ओळखीची वाट (कवितासंग्रह)
जाळरेषा (प्रशासकीय सेवेतील अनुभव)
टाकीचे घाव
डेल्टा १५ (प्रवासवर्णन)
तिढा (कादंबरी)

तुझ्याविना (कादंबरी)

पुनर्भेट (अनुभवकथन)
मी क्रांतिज्योती (अनुभवकथन)
मैत्र (ललित लेख)
रात्र वणव्याची (कादंबरी)
सत्य-कथा (व्यवसाय मार्गदर्शन)



हेही वाचा -

पोलिसांच्या गटारीवर ‘संक्रात’

KEM रुग्णालयात COVID 19 रुग्णांचे सर्व रेकॉर्ड्स डिजिटल स्वरुपात




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा