Advertisement

५ हजार फुलझाडांनी सजला मंत्रालय परिसर

मुंबईच्या मंत्रालय आणि विधीमंडळ परिसरात महापालिकेने ५ हजार फुलझाडे व शोभेची झाडे लावली आहेत. या झाडांमध्ये ३ हजार आकर्षक फुलझाडांची रोपे तर २ हजार शोभेच्या रोपांचा समावेश आहे.

५ हजार फुलझाडांनी सजला मंत्रालय परिसर
SHARES

कल्याणच्या श्रीमलंगडाजवळील मांगरूळ परिसरात शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी लावलेली हजारे झाडे भूमाफीयांनी लावलेल्या आगीत जळून खाक झाली. यावरून राज्य सरकार आणि वन विभागावर टीका होत असताना. मुंबईच्या मंत्रालय आणि विधीमंडळ परिसरात महापालिकेने ५ हजार फुलझाडे व शोभेची झाडे लावली आहेत. ही झाडे लावत महापालिकेने झाडे नुसती लावायची नसतात, तर टिकवायचीही असतात, असा जणू वन विभागाला संदेश दिल्याचं वाटत आहे.


कुठल्या मार्गांचा समावेश?

देशासह राज्याचं लक्ष वेधून घेणाऱ्या मुंबईतील मंत्रालय आणि विधीमंडळ परिसरातील मादाम कामा मार्ग, बॅ. रजनी पटेल मार्ग, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, फ्री प्रेस जनरल मार्ग इ. रस्त्यांच्या दुभाजकांमध्ये ही झाडे लावण्यात आली आहेत. विधिमंडळात लवकरच हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. ही शोभेची झाडं येणाऱ्या अभ्यागतांचं लक्ष नक्कीच वेधून घेतील.


झाडांची रंगरंगोटी

या झाडांमध्ये ३ हजार आकर्षक फुलझाडांची रोपे तर २ हजार शोभेच्या रोपांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ही सर्व रोपे ही महापालिकेच्या नर्सरीत वाढवलेली आहेत. यासोबत परिसरातील मोठ्या झाडांनाही रंगरंगोटी करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेचे उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.


विशेष माळीपथक

या रोपांमध्ये सदाफुलीसह, झिनीया, पिटुनिया, टोरोनिया, डायाथंस, सिलोशिया या विदेशी फुलझाडे आणि शोभेच्या झाडांचा ही समावेश आहे. विशेष म्हणजे वनविभागाप्रमाणे आपली फजिती होऊ नये, यासाठी महापालिकेकडून विशेष माळीपथक या रोपांची काळजी घेण्यासाठी तैनात करण्यात आलं आहे.हेही वाचा-

फक्त ५० कोटी झाडे लावल्याची टिमकी वाजवायचीय का? श्रीकांत शिंदे

समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, शिवसेनेची मागणीRead this story in हिंदी or English
संबंधित विषय