Advertisement

फक्त ५० कोटी झाडे लावल्याची टिमकी वाजवायचीय का? श्रीकांत शिंदे

बुधवारी रात्री दोन टेकड्यांवर लावण्यात आलेल्या झाडांना अज्ञातांकडून आग लावण्यात आली. या आगीत ७० टक्के झाडं जळाली आहेत. याआधी सुद्धा या झाडांना आग लावल्याची घटना घडली होती. परंतु, ही झाडं पुन्हा जगवण्यात वनविभागाला यश आलं होतं. मात्र पुन्हा या झाडांना आग लावल्यामुळे श्रीकांत शिंदे यांनी फेसबुक पोस्टद्वारे नाराजी व्यक्त केली आहे.

फक्त ५० कोटी झाडे लावल्याची टिमकी वाजवायचीय का? श्रीकांत शिंदे
SHARES

सरकारच्या वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी श्रीमलंगगड परिसरातील मांगरुळ या गावातील ओसाड टेकड्यांवर मानवनिर्मित जंगल उभारलं होतं. तसंच, श्रमदान करून एका दिवसात १ लाख झाडं लावली होती. परंतु, ही झाडं आज्ञातांनी लावलेल्या आगीमध्ये जळून खाक झाली आहेत. त्यामुळे वनविभागाला हजारो लोकांनी कष्टाने लावलेल्या झाडांचा साधा सांभाळ देखीलकरता येणार नसेल तर सरकारला काय फक्त ५० कोटी झाडे लावल्याची टिमकी वाचवायची आहे का? असा सवाल खासदार श्रीकांत शिंदे यांनी विचारला आहे.


कधी लागली आग?

बुधवारी रात्री दोन टेकड्यांवर लावण्यात आलेल्या झाडांना अज्ञातांकडून आग लावण्यात आली. या आगीत ७० टक्के झाडं जळाली आहेत. याआधी सुद्धा या झाडांना आग लावल्याची घटना घडली होती. परंतु, ही झाडं पुन्हा जगवण्यात वनविभागाला यश आलं होतं. मात्र पुन्हा या झाडांना आग लावल्यामुळे श्रीकांत शिंदे यांनी फेसबुक पोस्टद्वारे नाराजी व्यक्त केली आहे. वनविभागाच्या बेजबाबदारपणामुळेच हजारो हातांची मेहनत वाया गेल्याचा आरोप करत वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.


काय आहे पोस्टमध्ये?

हजारो लोकांनी कष्टाने लावलेल्या झाडांचा साधा सांभाळ देखील वनविभागाला करता येणार नसेल तर ५० कोटी झाडे लावण्याचे लक्ष्य कसे पूर्ण करणार? आणि ५० कोटी झाडे लावून वनविभाग ती जगवण्यासाठी प्रयत्न करणार नसेल तर ही झाडे लावून उपयोग काय? सरकारला केवळ ५० कोटी झाडे लावल्याची टिमकी वाजवायची आहे का? लोकांनी लावलेल्या झाडांची जबाबदारी वनविभागाला घ्यायची नसेल तर तसे त्यांनी स्पष्ट सांगावं आणि लोकांनाच याची जबाबदारी घ्यायला सांगावे. लोक ही झाडं जगवतील, वाढवतील... त्याचं श्रेय मात्र आम्ही तुम्हालाच देऊ…', अशाप्रकारचा संताप श्रीकांत शिंदे यांनी फेसबुक पोस्टद्वारे व्यक्त केला आहे.



हेही वाचा-

शिवसेना राजस्थानमध्येही निवडणूक लढवणार

मराठा आरक्षण: १ डिसेंबरला जल्लोष करा - मुख्यमंत्री



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा